विशाल अग्रवाल याला पुन्हा अटक, पोलिसांची गुप्तता, अटक लपवण्यामागील गौडबंगाल काय?

| Updated on: Jul 04, 2024 | 12:25 PM

pune porsche accident: विशाल अग्रवाल याच्या अटकेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. नेहमी एखादा छोट्या आरोपीस अटक केल्यानंतर त्याची माहिती पोलीस माध्यामांना देतात. परंतु चर्चेतील या बड्या आरोपीच्या अटकेची माहिती का लपवली?

विशाल अग्रवाल याला पुन्हा अटक, पोलिसांची गुप्तता, अटक लपवण्यामागील गौडबंगाल काय?
विशाल अग्रवालला 3 दिवसांची पोलीस कोठडी
Follow us on

पुणे हिट आणि रन प्रकरणात पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने भरधाव कार चालवत दोघांना चिरडले होते. त्या प्रकरणानंतर पोलिसांकडून ठोस कारवाई झाली नाही. त्यानंतर माध्यमांमधून प्रचंड टीका सुरु झाली. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबातील लोकांना आणि इतर जणांना अटक केली. त्या प्रकारानंतर पुणे पोलिसांनी बिल्डर विशाल अग्रवाल यांच्यासंदर्भात तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर विशाल अग्रवालसंदर्भात अनेक तक्रारी येऊ लागल्या. आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी विशाल अग्रवाल याला अटक केली. परंतु या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी ही गुप्तता नेमकी का पाळली? याबाबत ही पोलrस बोलायला तयार नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

विशाल अग्रवाल आज पुन्हा कोर्टात

पुण्यातील पोर्ष कार अपघात प्रकरणातील आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल याला सोसायटी धारकांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात हिंजवडी पोलिसांनी अटक केली होती. हिंजवडी पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक करत त्याची चौकशी सुरू केली होती. त्याला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ती आज संपत आली आहे. त्याला आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

विशाल अग्रवाल याच्या अटकेबाबत पिंपरी चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्यामुळे नवीन चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. नेहमी एखादा छोट्या आरोपीस अटक केल्यानंतर त्याची माहिती पोलीस माध्यामांना देतात. परंतु चर्चेतील या बड्या आरोपीच्या अटकेची माहिती का लपवली? यासंदर्भातील गौडबंगाल काय? ही गुप्तता नेमकी का पाळली? याबाबत ही पोलिस बोलायला तयार नाही. यामुळे पुन्हा एकदा पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.

हे सुद्धा वाचा

नेहमी प्रेस काढली जाते, मग आता…

पिंपरी- चिंचवड पोलीस एरवी साधे एक पिस्तूल सापडले तरी याबाबतची प्रेस नोट जाहीर करून मीडियात बातमी येण्यासाठी धडपड करत असतात. स्वतःची पाठ थोपटून घेतली जाते. परंतु, पोर्षं कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल याला ताब्यात घेतल्यानंतरही याबाबतची माहिती पोलिसांनी मीडियात येऊ दिली नाही, याबाबत कमालीची गुप्तता पोलिसांनी का बाळगली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

जमीन व्यवहार प्रकरणात एका रिअल इस्टेट एजंटला जीवे मारण्याची धमकी देऊन एक कोटी ३२ लाख रुपयांना गंडा घटल्याप्रकरणी विशाल अग्रवाल यांना गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या गुन्ह्यात अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश लष्कर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दिला होता. या आदेशाचा पुनर्विचार करण्याची याचिका पोलिस आणि सरकारी वकील यांनी सत्र न्यायालयात करण्यात आली होती. त्यानंतर विशाल अग्रवाल यांची न्यायालयीन कोठडी रद्द करत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.