साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?

| Updated on: Oct 08, 2021 | 9:04 PM

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची ड्रग्ज तस्करांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु असताना पुण्यातूनही एक भारी बातमी समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी भल्या पहाटे जबरदस्त कारवाई केली आहे.

साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?
साडेतीन कोटींचा चरस-गांजा, नेपाळी प्रवासी आणि पुणे ग्रामीण पोलीस, मुंबई-गोवा हायवेवर धरपकड, गुन्ह्यात पाकिस्तानचंही कनेक्शन?
Follow us on

पुणे : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची ड्रग्ज तस्करांविरोधात धडाकेबाज कारवाई सुरु असताना पुण्यातूनही एक भारी बातमी समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी भल्या पहाटे जबरदस्त कारवाई केली आहे. पोलिसांनी मुंबई-गोवा माहामार्गावर खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी ट्रॅव्हेल्स कंपनीच्या बसमध्ये ड्रग्ज बाळगणाऱ्या प्रवाशाला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्याजवळ तब्बल साडेतीन कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळेपासून आरोपीला बेड्या ठोकेपर्यंत ते संबंधित ड्रग्जचं पाकिस्तान कनेक्शन असा अनेक बाजूंनी पोलिसांनी तपास केला. पोलिसांच्या याच कारवाईची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्ह्यात चरस-गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी साफळा रचून मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुस्ताकीन हुनिया या आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांचे मुल्यांकन जवळपास साडेतीन कोटी रुपये इतके आहे. या कारवाईत 6 किलो चरस हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे-सातारा मार्गावरील राजगड पोलिसांनी केली आहे.

पोलिसांना चरस पाकिस्तानातून आणल्याचा संशय

एका खाजगी बसमधून ही तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे बिहारच्या पाटणा जवळील आणि नेपाळच्या सीमेवरुन हे चरस भारतात आणले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तस्करांची साखळी शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. हे चरस पाकिस्तानातून आले असावे, असा संशय व्यक्त करण्यात येतोय. त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करणार आहेत.

पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

राजगड पोलिसांनी शुक्रवारी (8 ऑक्टोबर) पहाटे मुंबई-गोवा हायवेवर, खेड-शिवापूर टोल नाक्यावर अंमली पदार्थ घेऊन जात असणाऱ्या एका आरोपीला अटक केली. त्याच्याकडे अंदाजे सहा किलो वजनाचे चरस सापडलं आहे. मुंबईहून गोवाकडे जात असणारा एक प्रवासी अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची राजगड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील, एपीआय मनोज नवसारे यांच्या पथकाने खेड शिवापुर टोलनाक्याजवळ डॉल्फिन ट्रॅव्हल्सने जात असणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली.

पोलिसांचा तपास सुरु

यावेळी मुळचा नेपाळच्या एका प्रवाशाकडे अंदाजे सहा किलो वजनाचा चोवीस लाखांचा चरस त्याच्या बॅगेमध्ये मिळून आला. या प्रवाशाला राजगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याबरोबर अजून कुणी साथीदार आहेत का, आरोपी या अंमली पदार्थाची कुठे-कुठे विक्री करणार होता? याचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

पानदरीबा भागात धाडसी चोरी, इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे शटर उचकटून अडीच लाखांचे साहित्य लंपास

ज्या जेलमध्ये कसाबला ठेवलं, संजय दत्त राहीला, तिथंच आता आर्यन खानची रवानगी, कशी आहे आर्थर रोड जेल?

कामगार महिलेला डोंगरावर नेत तिच्यासोबत भयावह कृत्य, पुणे पोलिसांनी कर्नाटकात जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या