Pune Crime | कॅप्सूलमध्ये लाखोंचं सोनं लपवलं, पोलिसांनी बरोबर हेरलं, पुणे विमानतळावर तस्कराला बेड्या

| Updated on: Sep 13, 2023 | 10:27 PM

पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बरोबर हेरलं आहे. आरोपी मोठ्या शकलीने कस्टम विभागाचे अधिकारी आणि पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याला हेरण्यात अधिकारी आणि पोलिसांना यश आलंय.

Pune Crime | कॅप्सूलमध्ये लाखोंचं सोनं लपवलं, पोलिसांनी बरोबर हेरलं, पुणे विमानतळावर तस्कराला बेड्या
Follow us on

पुणे | 13 सप्टेंबर 2023 : पुण्यातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावर पुन्हा सोन्याची तस्करी करणाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. कस्टम विभागाकडून या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून तब्बल 33 लाखांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे. आरोपी 24 कॅरेट सोन्याची तस्करी करत होता. त्याला रंगेहात पकडण्यात कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलं आहे. आरोपीकडून पहिल्यांदा अशाप्रकारे तस्करी करण्यात आली की याआधी देखील त्याने अशाप्रकारे सोन्याची तस्करी केली आहे, याचा तपास अधिकारी करत आहेत.

दुसऱ्या देशातून आपल्या देशात सोन्याची तसेच ड्रग्जची तस्करी करणाऱ्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याप्रकरणी विमानतळावर अधिकाऱ्यांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मात्र, सातत्याने अशा घटना समोर येत आहे. त्यामुळे आरोपींना पोलिसांचं आणि अधिकाऱ्यांची भीती राहिलेली नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. पुणे विमानतळावर याआधी देखील अशी घटना समोर आली होती. त्यानंतर पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झालीय.

आरोपी दुबईहून आला

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे विमानतळावर सोन्याची तस्करी करताना अटक करण्यात आलेला आरोपी हा दुबई येथून आला होता. तो अवैधरित्या सोन्याची तस्करी करत होता. आरोपीने कॅप्सूलमध्ये लपवून 22 लाखांचं आणलं होतं. पोलिसांकडून संबंधित आरोपीसह एकाला दोन कॅप्सूलसह अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून याप्रकरणी तपास सुरु आहे.

मुंबई विमानतळावर दोन दिवसांपूर्वीच मोठी कारवाई

विशेष म्हणजे नुकतंच पोलिसांनी सोन्याची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मोठ्या प्रमाणावर सोन्याची तस्करी सुरु होती, अशी माहिती या कारवाईतून समोर आलीय. विशेष म्हणजे नामांकित एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांचादेखील यात समावेश होता. पोलिसांनी याप्रकरणी एकूण सहा जणांना अटक केलीय. तसेच पोलिसांनी साडेचार कोटी रुपयांचे 7.4 किलो सोनं जप्त केलंय.

आरोपींकडून दुबई ते मुंबई अशी हवाई मार्गाने सोन्याची तस्करी सूरू होती. दुबईवरून सोने घेऊन निघालेला तस्कर मुंबई विमानतळावर उतरताच सोने सिटवरच सोडत असे. त्यानंतर विमान कंपनीच्या मदतीने सोने विमानतळाबाहेर काढले जाई. याप्रकरणी नामांकित विमान कंपनीचे कर्मचारी, प्रवासी, सोन्याची खेप स्वीकारणाऱ्या पिता-पुत्र सोनारांना देखील अटक करण्यात आलीय. संबंधित कारवाई ही दोन दिवसांपूर्वीच करण्यात आली होती.

आरोपींकडून डायरी जप्त करण्यात आलीय. आरोपी दररोज कोट्यवधी रूपयांचं सोन्याची तस्करी करून आणत असल्याचा दावा डीआरआयने केलाय. तसेच आरोपींनी महिन्याला 200 किलो सोन्याची तस्करी केल्याचा दावा करण्यात आलाय.