TET Exam Scam : 2018 च्या टीईटी परीक्षेतही घोळ, 500 जणांच्या निकालाशी छेडछाड, 5 कोटींचा आर्थिक व्यवहार : अमिताभ गुप्ता

| Updated on: Dec 21, 2021 | 12:50 PM

पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली आहे. 2018 च्या टीईटी परीक्षेतही (TET Exam Scam) घोटाळा झाला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे.

TET Exam Scam : 2018 च्या टीईटी परीक्षेतही घोळ, 500 जणांच्या निकालाशी छेडछाड, 5 कोटींचा आर्थिक व्यवहार : अमिताभ गुप्ता
अमिताभ गुप्ता
Follow us on

पुणे: पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (Amitabh Gupta) यांनी पत्रकार परिषद घेत टीईटी परीक्षेतील गैरप्रकाराबद्दल माहिती दिली आहे. 2018 च्या टीईटी परीक्षेतही (TET Exam Scam) घोटाळा झाला होता, अशी माहिती गुप्ता यांनी दिली आहे. 2018 मध्ये टीईटी परीक्षेतही घोळ झाला होता. त्यामध्ये गैरप्रकार झाली होती.आतासारखाच घोळ त्यावेळी झाला होता. 15 जुलै 2018 ला परीक्षा झाली तर निकाल 12 ऑक्टोबरला निकाल लागला होता. त्यावेळची परीक्षा नियंत्रक होते डेरे त्यांना अटक केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे.

500 लोकांच्या निकालाशी छेडछाड, बनावट प्रमाणपत्रही दिली

जी ए टेक्नॉलॉजीचे आश्विनकुमार होते, त्यांना अटक केली आहे. प्रीतिश देशमुख, हरकळचे दोन्ही भाऊ आणि  सावरीकर यांना अटक केली होती. ओएमआर मॅनिप्युलेट करायचे. ओएमआर कोरं ठेवायला लावायचे. त्यावर गोल रंगवायचे. यातून कोणी सुटून गेल्यास नापासला पास दाखवायचे. असा प्रकार   500 लोकांच्या निकालात बदल केले. शिक्षण विभागात विद्यार्थी पास झाले की रजिस्टरमध्ये नोंदणी करावी लागते. हे होऊ शकत नसल्यानं यातील आरोपींकडून बनावट प्रमाणपत्र देण्यात आली होती, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

तुकाराम सुपे, प्रीतिश देशमुखच्या चौकशीत धक्कादायक बाबी

2018 ला देखील या प्रकरणी तक्रार झाली होती. मात्र प्रकरण लॉजिकल एंडला गेले नव्हते. सुखदेव डेरे त्यावेळी प्रमुख होते. त्यानंतर तुकाराम सुपेकडे काही वेळ चार्ज होता. सुखदेव डेरे आणि आश्विन कुमारला अटक केली आहे. आता  झालेल्या तक्रारीचा तपास करताना हे समोर आलं आहे. काल आम्ही रात्री सायबर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आम्ही ज्यांना अटक केली आहे त्यातून लॅपटॉप मिळाला त्यातून ही लिंक पुढे आली आहे. तुकाराम सुपे आणि प्रीतिश देशमुख यांच्याकडे केलेल्या तपासात हे समोर आलं आहे.

5 कोटी पर्यंतचं प्रकरण

प्राथमिक अंदाजानुसार 500 लोकांच्या प्रमाणपत्रासंदर्भात माहिती मिळालीय. हा सर्व प्रकार 5 कोटी रुपयांपर्यंतचा असेल, असा अंदाज आहे. सुखदेव डेरे दोन ते तीन वर्ष निवृत्त झालेले होते. 2018 च्या प्रकरणासंदर्भात आमच्याकडे प्राथमिक माहिती आहे, असं अमिताभ गुप्ता म्हणाले आहेत.

संजय सानपला आरोग्य भरती संदर्भात अटक

आरोग्य भरतीतसंदर्भात संजय सानपला अटक केली होती. संजय सानप हा दलाल म्हणून काम करत होता. भरपूर दलाल आहेत आम्ही चौकशी करत आहोत. सर्व गोष्टी सांगू शकत नाही, कोर्टाला माहिती देऊ, असं अमिताभ गुप्ता म्हणाले.

इतर बातम्या :

TET Exam : पुणे पोलिसांकडून टीईटी परीक्षा प्रकरणी अटकसत्र सुरु, बंगळुरुतून आश्विन कुमार, बीडमधून संजय सानपला ठोकल्या बेड्या

Tukaram Supe : अबब ! तुकाराम सुपे याचं 2 कोटी 30 लाखांचं घबाड लेकीसह जावयाने लपवलं, पुणे पोलिसांचा सुपेला दणका


Pune Police Commissioner Amitabh Gupta said Sukhdev Dere and Ashwinkumar of GA Technologies done Maha TET exam of 2018 they cheat 500 people