Pune Police | पुणे पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हेगारी मोडण्यासाठी उचलले हे पाऊल

| Updated on: Oct 03, 2023 | 10:19 AM

Pune Police | पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. ही गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलली जात आहे. आता गुन्हेगारांच्या मुसक्या आवरण्यासाठी पोलिसांनी ब्रह्मास्त्र उचलले आहे. दोन जणांवर मोठी कारवाई केलीय.

Pune Police | पुणे पोलिसांची मोठी कारवाई, गुन्हेगारी मोडण्यासाठी उचलले हे पाऊल
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे | 3 ऑक्टोंबर 2023 : पुणे पोलिसांनी शहर आणि जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. आता लोणी काळभोर परिसरात दहशत माजविणाऱ्या टोळीविरुद्ध मोकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदानुसार कारवाई केली आहे. लोणी काळभोर परिसरात दहशत माजवून खंडणी उकळणाऱ्या घेणारे सनी ऊर्फ मृणाल मोहन शेवाळे (वय २६), प्रसाद बापूसाहेब भाडळे (वय २३), समीर बाबूलाल जमादार (वय २३, तिघे रा. उरुळी देवाची, सासवड रस्ता) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या आदेशानुसार आतापर्यंत पुणे शहरातील ६६ गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोकोका कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना दिलासा

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा प्राधिकरणाने डी एस कुलकर्णी यांची कंपनी मुंबईतील कंपनीला हस्तांतरीत करण्याचा आदेश दिला होता. परंतु आपल्याला बाजू मांडायला संधी मिळाली नाही, अशी भूमिका घेत डीएसके यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने त्यांना अपील करण्यासाठी सवलत दिली आहे. डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक केल्या प्रकरणात अटक झाली होती. सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.

नवमतदारांची नोंदणी करण्यात पुणे जिल्हा अव्वल

नवीन मतदारांची नोंदणी करण्यात पुणे जिल्हा अव्वल ठरला आहे. पुणे जिल्ह्यातून ८४ हजार नवीन मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी एक लाख जणानी अर्ज केला होता. मात्र १४ हजार अर्ज फेटाळण्यात आले आहे. दुबार नाव असलेले किंवा मयत होवून ही नाव न वागळलेल्या २४ हजार जणांची नाव मतदार यादीतून वगळली आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अद्ययावत करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसभा निवडणुकीसाठी हालचाली

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुसाठीच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. आता ५ जानेवारी २०२४ ला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदार याद्यातील दुरुस्ती करणे काम सध्या सुरु आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्या अद्यावत केल्या जात आहेत.

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळा निमित्त मावळातील बजरंग दलाने शौर्य जागरण यात्रेचे आयोजन केले आहे. पुणे जिल्ह्यात ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेची सुरवात किल्ले शिवनेरी येथून करण्यात आली. आता मावळ तालुक्यात रथ यात्रेचे आगमन झाले. मावळ तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या तळेगाव दाभाडे येथे या रथ यात्रेची मिरवणूक काढण्यात आली.