पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणातील मोठी अपडेट आली आहे. अल्पवयीन आरोपीच्या वडिलांपाठोपाठ आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिसांनी आज सकाळी अटक केली. सुरेंद्र अग्रवाल यांचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होतं. त्यांची चौकशी झाल्यानंतर अखेर त्यांना आज अटक करण्यात आली. या नंतर पुणे गुन्हे शाखेने थेट सुरेंद्र अग्रवाल यांचं घर गाठलं. त्यांच्या घरी पोलिसांनी छापेमारी सुरू केली. या छापेमारीत पोलिसांना काय सापडतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पुणे शहरातील कल्याणीनगर भागामध्ये भरधाव वेगात असलेल्या पोर्श गाडीने दोन जणांचा जीव घेतला. या प्रकरणात बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. यानंतर आता या प्रकरणातील गुंता वाढल्याचे बघायला मिळतंय. सध्या विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत असून 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये.
गुन्हे शाखेने सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्या घराची झाडाझडती घेतली. यापूर्वी देखील विशाल अग्रवालला घेऊन पुणे पोलीस घरी गेले होते. विशाल अग्रवालचा लपवण्यात आलेला मोबाईल पुणे पोलिसांनी तिथूनच जप्त केला. अग्रवाल यांच्या घराखालील सीसीटीव्हीची देखील पडताळणी पोलिसांकडून केली जातंय. अजून पोलिसांच्या हाती काही महत्वाची माहिती लागण्याची शक्यता देखील आहे.
सुरेंद्र अग्रवालच्या घरातील छापेमारी संपली
घरातून सीसीटीव्ही फुटेजचा डाटा जप्त करण्यात आलाय. घरातील नोकरांची देखील चौकशी करण्यात आलीये. गरज पडल्यास या सगळ्या कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तलयात बोलावून जबाब घेणार. घरातील गेटवर असणारे रजिस्टर देखील जप्त करण्यात आलंय. सुरेंद्र कुमार यांच्यावर त्यांच्या वाहन चालकाला घरात डांबून ठेवल्याचा आरोप.
अग्रवाल यांच्याविरोधात काही तक्रारी असतील तर पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. विशाल अग्रवाल यांच्यासोबतच आता सुरेंद्र अग्रवाल यांच्या समस्यांमध्येही मोठी वाढ झाल्याचे बघायला मिळतंय. सुरेंद्र अग्रवाल याच्या विरोधात येरवडा पोलिसांनी अपहरणाचे कलम लावले आहेत. कलम 365 आणि 368 कलम लावले आहेत.
सुरेंद्र अग्रवाल यांनीच दोन दिवस ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. यापूर्वीच पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चाैकशी केली होती. विशाल अग्रवाल यांनी पोलिसांना पोर्श गाडी मीच गाडी चालवत असल्याचा जबाब देण्यास चालकाला सांगितले होते. यासाठी त्याला मोठ्या पैशांची ऑफर देखील देण्यात आली होती. अजूनही या प्रकरणात मोठे खुलासे होऊ शकतात.