लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा महाराष्ट्रात सुरु असताना पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला आहे. अत्याचार करण्यापूर्वी आरोपींनी त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्यांना दारू पाजली. मग त्या मुलींना लॉजवर नेले. त्या ठिकाणी अत्याचार केला. अत्याचार झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन आहे. मुली घरी पोहचल्यावर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या दोघांवर राजगुरुनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार झाला आहे.
पुणे शहरात गोळीबार, कोयता वार असे गुन्हे वारंवार घडत आहे. प्रेम प्रकरणातून मुलीवर कोयत्याने वार झाल्याचा प्रकार पुण्यातील पेरु गेट पोलीस चौकीजवळ काही महिन्यांपूर्वी घडला होता. पुण्यातील गुन्हेगारी वाढली असताना आता त्याचे लोण परिसरात पोहचले आहे. पुण्याच्या राजगुरुनगर शहरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. त्या मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन देऊन आरोपींनी अत्याचार केला आहे.
महाविद्यालयातील दोन अल्पवयीन मुलींना आरोपींनी ड्रग्स दिल्यावर त्यांना मद्य पाजले. त्यानंतर त्यांना लॉजवर नेले. आरोपींना अमानुषपणे त्या मुलींवर अत्याचार केला. रात्रभर त्या मुलींवर अत्याचार झाला. १४ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुली घरी आल्यावर पालक हादरले. त्यांनी मुलींची अवस्था पाहून त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यानंतर पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.
खेड पोलीस ठाण्यात पालकांनी तक्रार दिल्यावर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत तपासाची चक्रे फिरवली. या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतले. त्यात एक जण अल्पवयीन आहे. तिसरा आरोपी मुख्य सूत्रधार आहे. तो फरार झाला आहे. या प्रकरणात ड्रग्स पुरवठा करणारा आणि अत्याचार करणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.