पुणे ससूनमध्ये डॉक्टराकडून धक्कादायक प्रकार, पहाटेच्या अंधारात डॉक्टर करायचा असे काही…

| Updated on: Jul 23, 2024 | 10:04 AM

Punc Crime News: पुणे शहरातील रस्त्यांवर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते ससून रुग्णालयात दाखल करत होते. परंतु दुसऱ्या दिवशी तो रुग्ण गायब होता. या प्रकरणाचा तपास केल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पुणे ससूनमध्ये डॉक्टराकडून धक्कादायक प्रकार, पहाटेच्या अंधारात डॉक्टर करायचा असे काही...
Follow us on

Sassoon Hospital Pune: ससून रुग्णालयात काय चालले आहे? असा प्रश्न पडला आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरण, पुण्यातील पोर्श कारमधील अल्पवयीन मुलाचा बनावट रिपोर्ट देण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर ससूनमधील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. ससूनमधील डॉक्टर रुग्णावर उपचार करण्याऐवजी त्यांना निर्जनस्थळी सोडून येत होतो. डॉक्टरी पेशाला कलंक लावण्याचा लाजीरवाणा प्रकार ससून रुग्णालयात घडला आहे. या संदर्भात एका सामाजिक संस्थेने भांडाफोड केला आहे. तसेच येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

काय घडला प्रकार

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते रितेश गायकवाड आणि दादासाहेब गायकवाड यांनी खळबळजनक प्रकार समोर आणला आहे. ते बेवारस रुग्णांची सेवा करतात. शहरातील रस्त्यांवर बेवारस पडलेल्या जखमी व्यक्तींना ते ससून रुग्णालयात दाखल करतात. त्यांनी एका बेवारस रुग्णाला ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. परंतु दुसऱ्या दिवशी तो रुग्ण गायब होता. या संदर्भात चौकशी केल्यावर त्या रुग्णाला रात्री डॉक्टर घेऊन गेले परत आणले नाही, अशी माहिती मिळाली. यामुळे त्या रुग्णांसंदर्भात काहीतरी गैरप्रकार झाल्याची शंका दादासाहेब गायकवाड यांना आली. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आला आहे.

असा उघड झाला प्रकार

दादासाहेब यांनी ससूनमधील प्रकार उघडकीस आणण्यासाठी सापळा रचला. त्यांनी रितेश यांच्यासोबत ससून रुग्णालय बाहेर काही दिवसांपासून पाहणी सुरू केली. सोमवारी पहाटे दीड वाजता रितेश रिक्षा घेऊन ससून रुग्णालयाबाहेर उभे होते. त्यावेळी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना रिक्षावाला असल्याचे समजून एका रुग्णाला सोडून यायचे आहे, येणार का अशी चौकशी केली. कुठे सोडायचे अशी विचारल्यावर या ठिकाणावरुन लांब नेऊन सोड,पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला नाही पाहिजे, असे म्हटले. त्यांनी त्यांना म्हटले ‘नेमके कुठे सोडू ? मी एकटा कसा सोडवू, नातेवाईक पाहिजे सोबत’ असे विचारल्यावर डॉक्टर म्हणाले, तू नवीन आहेस, आमचा नेहमीचा रिक्षावाला पाचशे रुपये दिले की बरोबर सोडून येतो, असे डॉक्टरांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

रिक्षेतून पुन्हा रुग्णाला सोडले

काही वेळाने डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, नवीन बिल्डिंगमधून दोन्ही पाय नसलेला, हातात सुई व विविध ठिकाणी जखमी झालेला एक रुग्ण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रिक्षात ठेवला. त्या रुग्णाना घेऊन रिक्षासोबत डॉक्टर व त्यांचा सहकारी विश्रांतवाडी येथील एका दाट वडाच्या झाडाजवळ पोहचले. अंधारात व पावसात त्या रुग्णाला त्या झाडाखाली सोडून डॉक्टर निघून गेले. त्यानंतर रितेश याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. येरवडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली. त्यानुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दादासाहेब गायकवाड यांच्या मदतीने त्या रुग्णाना पुन्हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.