पुणे : डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे (Hidden Cameras) आढळल्यानं एकच खळबळ उडालीय, त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती विद्यापीठातील कॅम्पसमध्ये राहणाऱ्या 31 वर्षीय डॉक्टर महिलेच्या बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळलेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित डॉक्टर महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Pune Sensation After Doctors Found Hidden Cameras In a Women Bedroom And Bathroom, Filing a Crime)
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिला या डॉक्टर असून, भारती विद्यापीठ कॅम्पस परिसरात असणाऱ्या कॉर्टरमध्ये त्या राहतात. सहा जुलै रोजी त्या सकाळी 8:45 वाजता नेहमीप्रमाणे कामावर गेल्या होत्या. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्या घरी परत आल्या. यावेळी त्यांना बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावले असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, अज्ञात इसमाने बनावट चावीच्या सहाय्याने लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करून त्यांचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने बाथरूम आणि बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून फिर्यादीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारती विद्यापीठ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.
संबंधित बातम्या
Pune Sensation After Doctors Found Hidden Cameras In a Women Bedroom And Bathroom, Filing a Crime