Pune News | कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, जनावरांना नवीन आजार, शेतकऱ्यांसमोर संकट

| Updated on: Oct 08, 2023 | 10:45 AM

Pune News | पुणे जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून रविवारी पहाटे दरोडा टाकला गेला आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांकडून लूट करण्यात आली. त्याने तातडीने पोलीस धाव घेत तक्रार दाखल केली. पुढे पोलिसांनी काही तासांत...

Pune News | कोयत्याचा धाक दाखवून दरोडा, जनावरांना नवीन आजार, शेतकऱ्यांसमोर संकट
Follow us on

पुणे | 8 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्यात दरोडा टाकल्याची घटना घडली. पुणे येथील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे हा दरडो पडला. रविवारी पहाटेच्या सुमारास पायी चाललेल्या नागरिकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले. नागरिकांनी तातडीने पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर काही तासात शिक्रापूर पोलिसांनी पाच जणांच्या टोळक्यावर कारवाई करत त्या दरोडेखोरांना जेरबंद केले. पोलिसांनी श्रीकांत मिनिनाथ मारणे, रोहित बाबुराव पवार, गणेश नितीन जावडेकर, जितेंद्र शंकर चिंधे आणि अनिकेत अनिल वाघमारे या पाच जणांना अटक केली.

जनावरांमध्ये नवीन आजार, शेतकऱ्यांसमोर संकट

पुण्याच्या भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण खोऱ्यात असणाऱ्या दुर्गम कुडली बुद्रुक गावातील शेतकऱ्यांसमोर नवीन संकट आले आहे. या भागातील गुरांना नवीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे सहा जनावरे दगावली आहेत. बोटुलिझम नावाच्या रोगामुळे ही जनावरे दगावली आहेत. दगावलेल्या जनावरांमध्ये 5 गाय आणि 1 वासराचा समावेश आहे. शेतकऱ्यांची दुभती जनावरे दगावत असल्यामुळे त्याचे आर्थिक नुकसान होत आहे. या आजारासंदर्भात पशुसंवर्धन विभागाकडून उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शिक्षकांच्या जागा रिक्त, मावळमध्ये मुख्याध्यापकास घेराव

मावळच्या कान्हे फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेला पालकांनी घेराव घातला. मावळ तालुक्यात तब्बल 125 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तालुक्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणजे कान्हे फाटा येथील जिल्हा परिषदची शाळा आहे. शाळेत खाजगी शाळेतील इंग्लिश मीडियममधून अनेक विद्यार्थी आले होते. शाळेत 684 विद्यार्थी असून शिक्षक मात्र पंधरा आहे. शिक्षक कमी असल्यामुळे पालक संतप्त झाले. सहा महिने उलटूनही शिक्षक नाही आमच्या मुलांच्या भविष्याचे काय? असा सवाल पालकांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

पुणे आंबेगावमध्ये डोळ्यांची साथ

पुणे परिसरात काही दिवसांपूर्वी डोळ्याची साथ आली होती. आता पुन्हा आंबेगाव तालुक्यात डोळ्यांची साथ आली आहे. आंबेगावमधील मंचर, घोडेगाव परिसरात डोळ्यांची साथ आलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर डोळे आलेल्या रुग्णांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मावळ तालुक्यात बिबट्यांची दहशत

आंदरमावळात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. या परिसरात दिवसा ही बिबट्या नागरी वस्तीत वावरू लागल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहे. वन विभागाने बिबट्याचा लवकर बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बिबट्यांच्या दहशतीमुळे शेतात रात्री पाणी सोडण्यास शेतकरी जात नाही. गेली सहा महिने या परिसरात बिबटे वावरत आहेत.