पुणे : लष्कराच्या मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील (गुप्तवार्ता संकलन प्रशिक्षण संस्था) लेफ्टनंट कर्नल पदावरील महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पुणे शहरातील वानवडी परिसरात बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पोलिसांनी हिमाचल प्रदेशमधील आर्मी ट्रेनिंग कमांड येथील लष्कराच्या ब्रिगेडियरवर (सुपिरियर आर्मी ऑफिसर) गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
रश्मी आशुतोष मिश्रा (वय 43 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला अधिकाऱ्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. अजित मिलू असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात 43 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे.
पुण्यातील वानवडी भागात मिलिट्री इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो (MINTSD) ही प्रशिक्षण संस्था आहे. इथे भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल, पॅरा मिलिटरी फोर्स, नागरी गुप्तचर संस्था यामधील गुप्तचर विभागातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या ठिकाणी महिला अधिकारी मृतावस्थेत आढळल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात होता.
कोण होत्या रश्मी मिश्रा?
रश्मी मिश्रा या मूळ जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समधे पोस्टिंगला होत्या. पुण्यातील आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्या आल्या होत्या. त्यातील तीन महिन्यांचे ट्रेनिंग पूर्णही झाले होते. त्यांचे पती देखील कर्नल आहेत, अशी माहिती पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.
नागपुरात भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास
दुसरीकडे, भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेतला. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला होता. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला.
संबंधित बातम्या :
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड
पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत
पुण्यात 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिला मृतावस्थेत आढळली, आत्महत्येचा संशय