पुणे | 10 ऑगस्ट 2023 : शाळेला शिक्षणाचे मंदिर म्हटले जाते. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांची ही भावना असते. तशीच भावना समाजाची असते. पुणे जिल्ह्यातील शाळेत एका शिक्षकाने धक्कादायक प्रकार शाळेतच केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने केलेल्या या प्रकारामुळे गावच हादरले नाही तर सर्व समाजला धक्का बसला आहे. ज्ञानदानाचे कार्य 19 वर्षे केल्यानंतर एका प्रकारामुळे शिक्षकाने टोकाचे पाऊल गाठले. अपराधीपणाची भावना माझ्या मनात खोलवर रुजली, यामुळे मी हे पाऊल उचलत असल्याचे त्या शिक्षकाने म्हटलंय.
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात हा प्रकार घडला. या तालुक्यात जावजीबुवाची वाडी हद्दीत जिल्हा परिषदेची होलेवस्ती येथे प्राथमिक शाळा आहे. या शाळेत अरविंद ज्ञानेश्वर देवकर यांची नुकतीच बदली झाली होती. 46 वर्षीय देवकर यांनी 19 वर्ष विविध ठिकाणी ज्ञानदानाचे कार्य केले. शाळेत बदली होताच या शिक्षकाने आधी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे 13 दिवस अध्यापन करु शकलो नाही, असे शिंदे यांनी म्हटले.
स्वच्छता मोहिमेत विद्यार्थ्याकडून शौचालय साफ करून घेणे पालकांना आवडले नाही. यामुळे 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी जाबनीबुवा येथील शाळेत प्रवेश घेतला. देवकर यांच्या शाळेत एकच विद्यार्थी राहिला. यामुळे त्यांनी पालकवर्गाची माफी मागून एक संधी देण्याची विनंती केली. परंतु पालकांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. समाजाचे आपल्याकडून नुकसान झाल्याची त्यांची भावना झाली. यामुळे वर्गातच त्यांनी विषारी तणनाशक पिऊन जीवन संपवले.
या घटनेत कोणालाही जबाबदार धरु नये, असे अरविंद देवकर यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे. या प्रकारामुळे सर्वच शिक्षकांना धक्का बदला आहे.