Pune Landslide : अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम

| Updated on: Jul 17, 2022 | 8:06 AM

Anuskura Ghat : अनुस्कुरा घाटामध्ये आज सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली.

Pune Landslide : अनुस्कुरा घाटात दरड कोसळण्याचं सत्र सुरुच! पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम
घाटात पुन्हा दरड कोसळली..
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून अनुस्कुरा घाटात (Anuskura Ghat Landslide) दरड कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. हे सत्र सुरुच असून आज पहाटेही पुन्हा एकदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. या घाटात दरड कोसळून वाहतूक कोंडीही (Traffic Updates) झाली होती. काही काळ पुण्याकडे येणारी वाहतूक ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे (Ratnagiri Rain News) अनुस्कुरा घाट सध्या प्रवासासाठी धोकादायक बनला आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात धुव्वाधार पाऊस झाला असून या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोकाही वाढला आहे. परिणामी वाहन चालकांनाही खबरदारी बाळगून आणि सतर्क राहत या मार्गावरुन गाड्या हाकण्याचं आवाहन केलं जातंय. अनुस्कुरा घाटामध्ये आज सकाळी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा दरड कोसळली. यामुळे रत्नागिरीवरुन राजापूर कोल्हापूरमार्गे पुण्याला जाणारी एसी बस घाटात घडकली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहतुकीची मोठी कोंडी होऊन दूरवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सातत्यानं दरड कोसळण्याच्या घटना

अनुस्कुरा घाट हा कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या प्रमुख घाटांपैकी एक आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या घाटात गेल्या काही दिवसांत अनेकदा दरड कोसळण्याच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अनेकदा घाटमार्गातील काही भागात एकेरी वाहतूक सुरु ठेवण्यात आलेली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा दरड कोसळण्याची घटना समोर आल्यानं चिंता व्यक्त केली जातेय.

हे सुद्धा वाचा

14 जुलैलाही कोसळली होती दरड : पाहा व्हिडीओ

मुसळधार पाऊस, दरड कोसण्याच्या घटना या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफची पथकंही तैनात करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन एनडीआरएफची पथकं तैनात केली गेली आहेत. एकीकडे अनुस्कुरा घाटात दरड कोसळली आहे, तर दुसरीकडे परशुराम घाट हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परशुराम घाटातही दरड कोसळली होती. त्यानंतर परशुराम घाटातील वाहतूक 30 जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत परशुराम घाट पूर्णपणे बंद ठेवण्यात आलाय. तर सकाळी सहा ते संध्याकाळी सात या वेळेत एकेरी वाहतूक अवजड वाहनांसाठी मर्यादित स्वरुपात सुरु ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरीला झोडपलं

गेल्या दोन आठवड्यात रत्नागिरीमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसानं रत्नागिरीसह कोकणातल्या सर्वच तालुक्यांना झोडपून काढलंय. त्यामुळे रत्नागिरीसह सिंधुदुर्गातीलही नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. समुद्राही उधाण आल्यानं मुसळधार पावसात पाहायला मिळालं होतं. तर पावसाचा जोर पाहता कोकणातील रस्ते मार्गही धोकादायक बनत चालल्याचं दरड कोसण्याच्या घटनांवरुन अधोरेखित होताना पाहायला मिळालंय.