पिंपरी – दुकानात कामाचे आगाऊ पैसे देण्यास नकार देणे दुकान मालकाला चांगलेच महागात पडले आहे. कामाचे आगाऊ पैसे देण्यास मालकाने नकार दिल्याने रागावलेल्या कामगाराने थेट दुकानालाचा आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरीमधील थेरगाव येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी कामगारावर एफआयआर दाखल करत अटक केली आहे. याबाबत दुकान मालक शंकर लक्ष्मण सोनावणे ( वय ५१ , नखातेनगर , थेरगाव ) यांनी आरोपी प्रकाश शंकरराव सोनकांबळे (बिदर , जि, भालकी ) यांच्या विरोधात वाकड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
…तर झाले असे
फिर्यादी सोनावणे यांच्या मुलाचे थेरगावमधील दत्तनगर येथे ओमसाई कुशन नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी प्रकाश सोनकांबळे कामगार म्हणून काम करत होता. प्रकाशने मालक सोनावणे यांना कामाचे आगाऊ पैसे मागितले मात्र सोनावणे यांनी पैसे देण्यास नकार दिला. मालकाने आपल्याला पैसे दिले नसल्याचा राग प्रकाशच्या मनात होता. या रागातूनच त्याने शिवीगाळ करत संधी मिळताच दुकानाला आग लावली.
बाजूच्या दुकानांचेही नुकसान
आरोपी प्रकाश सोनकांबळेने लावलेल्या आगीमुळे बाजूच्या दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. कामगाराच्या या कृत्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका इतर दुकानांही बसला आहे. यापूर्वीही पिंपरीमध्ये मालकाने काम वरून काढून टाकल्याचा राग मनात धरत , वाहन चालकाने थेट मालकाची चारचाकीचा पेटवून दिली होती. या घटनेचा व्हिडिओ ही व्हायरल झाला होता.
प्रेयसीची हत्या, दगड बांधून मृतदेह खाडीत टाकला, विरारमधील खुनाचा पाच दिवसात उलगडा
अवकाळी पावसात 2 हजार जनावरे दगावली, राज्य सरकारकडून पशूपालकांना मिळणार आर्थिक मदत