योगेश बोरसे, पुणे, दि.15 जानेवारी 2024 | पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांच्या तपास वेगाने सुरु आहे. या प्रकरणी अनेक जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहे. शरद मोहोळ याची हत्या हा आंतरराष्ट्रीय कट आहे. दशतवाद्यांकडून त्याची हत्या घडवण्यात आली आहे. जर्मन बेस्ट बेकरी स्फोटातील संशयित दहशतवादी कातील सिद्दकी याची हत्या शरद मोहोळ याने केली. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर शरद मोहोळ याला संपवण्यात आला. या प्रकरणात राज्य सरकारच्या तपासात आम्ही समाधानी नाही. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी पुण्यात केली. हिंदुत्ववादी संघटना २८ जानेवारी २०२४ ला पुण्यात या हत्येच्या तपासासाठी जनमोर्चा काढणार असल्याचे मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. यामध्ये काही राजकीय दबाव असल्याचा संशय पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
शरद मोहोळ हे हिंदुत्ववाद्याचे नेतृत्व करतील असे त्याचे कार्य होते. या प्रकरणासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी माहिती दिली होती, त्यावेळी ती माहिती पूर्ण नव्हती. आता त्यांना पूर्ण माहिती मिळाली आहे. स्वाती मोहोळ यांनीही त्यांची भेट घेतली होती. आमचा गृह खात्यावर अजिबात आक्षेप नाही. परंतु जो तपास सुरू आहे, त्यावर आम्ही समाधानकारक नाही. आरोपींच्या गाडीत पैसे सापडल्याची माहिती आहे.
पुण्यात अनेक आंतकवादी सापडले आहेत. शरद मोहोळ याने कतील सिद्दीकी या दहशतवाद्याची हत्या केल्याचा आरोप आहे. यामुळे शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी स्थानिक पातळीवरचे नाही. त्याच्या हत्येसाठी विदेशी बनावटीची पिस्तुले हत्येसाठी वापरण्यात आले आहे. किनारा हॉटेलमध्ये काही आरोपी एकत्र झाले होते, त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज मिळत नाही. यामुळे ही हत्या दहशतवादी संघटनाकडून झाल्याचा संशय आहे.
या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्याची मागणी करण्यात आली. यासाठी 28 तारखेला कोथरूड ते शिवाजीनगर मोर्चा काढण्यात येणार आहे. शरद मोहोळ याला न्याय मिळावा यासाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांनी सांगितले.