Sharad mohol murder case | दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेट्स

| Updated on: Jan 06, 2024 | 12:59 PM

Sharad mohol murder case | पुणे शहरात गँगवारमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी हत्या झाली. गर्दीतून आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद मोहोळ याची हत्या झाली. त्यावेळी त्याने ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल झाले आहे.

Sharad mohol murder case | दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? लग्नाच्या वाढदिवशी शरद मोहोळचे पत्नीसाठी स्टेट्स
Follow us on

योगेश बोरसे, पुणे, दि. 6 जानेवारी 2024 | पुणे शहरात शुक्रवारी भरदिवसा गोळीबार झाला. चार हल्लेखोरांनी गुंड शरद मोहोळ याची भरदुपारी हत्या झाली. शरद मोहोळ याची हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून त्याचा सहकारी साहिल पोळेकर याचे नाव समोर आले आहे. साहिल केवळ सात दिवसांपूर्वीच त्याचा गँगमध्ये आला होता. त्यानंतर जमिनीच्या आणि पैशांच्या वादातून त्याने शरद मोहोळ याला संपवले. विशेष म्हणजे पाच जानेवारी रोजी शरद मोहोळ याच्या लग्नाच्या वाढदिवस होता. लग्नाच्या वाढदिवसामुळे त्याच्या कार्यालावर गर्दी झाली होती. सर्वांच्या शुभेच्छी स्वीकारून देवदर्शनासाठी तो कार्यालयाच्या बाहेर पडला. त्यावेळी गर्दीतून पुढे आलेल्या चौघांनी त्याच्यावर गोळ्या चालवल्या. आता शरद मोहोळ याने ठेवलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. त्यात म्हटले की, ‘ दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? ‘ गाण्यावर शरद मोहोळ याने पत्नी स्वाती मोहोळे हिला शुभेच्छा दिल्या आहेत. सा स्टेट्मध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

पत्नीला दिल्या अनोख्या शुभेच्छा

गुंड शरद मोहोळने पोस्ट केलेले व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल झाले आहे. ‘ दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? या गाण्यावर त्याने पत्नी स्वाती मोहोळे हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. या पोस्टमध्ये दोघांचा फोटो पोस्ट करून लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. शरद मोहोळ याने हत्येच्या काही वेळापूर्वी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवले होते. त्यानंतर पुढच्या काही तासातच त्याच्यावर गोळीबार झाला.

सीसीटीव्ही फुटेच आले समोर

शरद मोहोळ याच्यावर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्हीमध्ये शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्याच्या दिसत आहे. चार राऊंड फायर केल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. शनिवारी या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शरद मोहोळ याच्या साथीदारांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचे दिसत आहे. गोळ्या झाडून त्या ठिकाणावरुन त्याचे साथीदारांनी पळ काढला. आर्थिक व्यवहारातील वादातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे. या दोन हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे.