Pune News | महामार्गावर एसटी- ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहने समोरासमोर

| Updated on: Oct 07, 2023 | 8:14 AM

Pune Accident News | पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एसटी बस आणि ट्रकमध्ये झाला आहे. दोन्ही वाहने समोरा समोर धडकली आहेत. शुक्रवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये...

Pune News | महामार्गावर एसटी- ट्रकचा भीषण अपघात, दोन्ही वाहने समोरासमोर
Follow us on

सुनिल थिगळे, जुन्नर, पुणे | 7 ऑक्टोंबर 2023 : पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला माळशेज घाटात भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री एसटी बस आणि ट्रक समोरासमोर धडकल्या. हा अपघात इतका भीषण होती की अपघातानंतर ट्रक जागीच पलटी झाली. तसेच अपघातामध्ये एसटी बसचे मोठे नुकसान झाले. ठाणे जिल्ह्यात असलेला माळशेज घाट आणि नगर – कल्याण महामार्गावर सातत्याने अपघात होत आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या महामार्गावर होणाऱ्या अपघातांमुळे अनेक लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे.

कधी झाला अपघात

कल्याण महामार्गावर माळशेज घाटात काल शुक्रवारी रात्री साधारण ११.३०चा सुमारास हा अपघात झाला आहे. एसटी आणि ट्रकची धडक एवढी भीषण होती की, ट्रक जागीच पलटी झाला तर एस टी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे. कल्याण – शिरोली बस ही शिरोली येथे मुक्कामी येत होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर ट्रक कल्याणच्या दिशेने जात होता. अपघाताप्रसंगी ट्रक आणि बस हे दोन्ही वाहने समोरासमोर आले आणि हा अपघात झाला.

हे सुद्धा वाचा

बसमधील प्रवासी होते झोपेत अन्

नगर कल्याण महामार्गावर माळशेज घाटात शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. दोन्ही गाड्या समोरासमोर धडल्या. बसमधील अनेक प्रवाशांना डुलकी लागली होती. जोरदार धक्क्यानंतर सर्वच जण घाबरले. अनेक जण गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होती की त्यानंतर ट्रक महामार्गावरच उलटला. ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातात अनेक प्रवाशी जखमी

कल्याण शिरोली बस कल्याणवरुन निघाली होती. कल्याणवरून जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती. त्यावेळी माळशेज घाटात अपघात झाला. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

महामार्ग बनला मृत्यूचा सापळा

कल्याण- नगर महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहे. काही दिवसांपूर्वी महामार्गावर पाच शेत मजुरांना एका गाडीने उडवले होते. त्या अपघातात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाला होता. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या अपघात प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.