israel hamas war | इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद थेट पुण्यात…नेमके काय घडले

| Updated on: Oct 23, 2023 | 9:02 AM

israel hamas war | इस्रायल आणि हमासमध्ये 7 ऑक्टोबरपासून घनघोर युद्ध सुरु आहे. गाझात इस्त्रायलकडून सर्व बाजूंनी हल्ले सुरु आहे. या युद्धाचे पडसाद पुणे शहरात उमटले आहे. पुणे पोलिसांनी वेळीच कारवाई करत काही जणांवर...

israel hamas war | इस्त्राईल आणि हमास युद्धाचे पडसाद थेट पुण्यात...नेमके काय घडले
Follow us on

अभिजित पोते, पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : इस्रायली आणि हमास याच्या दरम्यान सुरु असलेले युद्ध अजूनही पेटणार आहे. इस्त्रायली सैन्याने पॅलेस्टिनी नागरिकांना गाझापट्टी रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा त्यांनाही अतिरेकी समजण्यात येऊन कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. गाझातील लोकांना उत्तर गाझातून दक्षिणेकडे जाण्यास सांगितले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या युद्धाचे पडसाद उमटत आहे. या युद्धाच्या निमित्ताने पुणे येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच रस्त्यावर लावलेले स्टीकर जप्त केले आहे.

काय घडले पुणे शहरात

इस्त्रायल आणि हमास युद्धाचे पडसाद पुणे शहरात उमटले आहे. या युद्धाच्या निमित्ताने पुणे शहरातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न काही जणांकडून करण्यात आला आहे. पुणे शहरातील काही भागांत इस्त्राईल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेले स्टिकर्स लावण्यात आले आहे. शहरातील काही रस्त्यांवर इस्त्रायल देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृतीचे स्टिकर्स चिटकवण्यात आले आहे. काही जणांनी शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी हे कृत्य केले आहे.

पुणे पोलिसांची कारवाई

पुणे शहरातील रस्त्यांवर जाणीवपूर्वक इस्त्रायल देशाचे स्टिकर चिटकवल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरु केली. या प्रकरणी पुणे शहरातील 4 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील लष्कर, समर्थ, कोंढवा आणि खडक पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात एकूण 6 आरोपी निष्पन्न झाले आहे.

हे सुद्धा वाचा

सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न

पुणे शहरातील सामाजिक सलोखा जाणून-बुजून बिघडवण्याचा प्रयत्न आरोपींकडून केले गेला आहे. यामुळे पोलिसांकडून संबंधित ठिकाणी लावलेले स्टिकर्स त्वरित काढले आहे. या प्रकरणातील आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान या युद्धामुळे अडचणीत आलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना मदत भारताने पोहचवली आहे. भारताकडून औषधींचा पुरवठा पॅलेस्टिना नागरिकांना करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने ही मदत पाठवण्यात आली आहे. भारताच्या या मदतीनंदर पॅलिस्टिन सरकारने आभार मानले आहे.