बारामती आहे की अमेरिका? बारावीच्या विद्यार्थ्याची वर्ग मित्रानेच कॉलेजमध्येच केली हत्या

| Updated on: Oct 01, 2024 | 12:20 PM

Pune Crime: दोन विद्यार्थ्यांमध्ये एक महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. हा वाद पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन झाला होता. त्याचा राग मनात ठेवून हा कोयत्याने हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याचे सांगितले.

बारामती आहे की अमेरिका? बारावीच्या विद्यार्थ्याची वर्ग मित्रानेच कॉलेजमध्येच केली हत्या
पिंपरी चिंचवडमध्ये लॉजमध्ये हत्याकांड
Follow us on

अमेरिकेतील शाळा, कॉलेजमध्ये गोळीबार होण्याचा घटना अनेक वेळा घडतात. परंतु आता सर्व पालकांनी चिंता निर्माण करणारी बातमी आली आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक जिल्ह्यात बारावीच्या विद्यार्थ्याचा कॉलेजमध्ये खून झाला आहे. कॉलेजमधील विद्यार्थ्यानेच कोयत्याने वार करुन हा खून केला आहे. बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात दोन अल्पवयीन मुलांमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र चिंता निर्माण होऊ लागली आहे. आरोपी आणि खून झाला तो विद्यार्थी एकाच वर्गात शिकत होते.

नेमका काय घडला प्रकार

बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद कॉलेजमध्ये सोमवारी एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करुन त्याचा खून केला. कोयत्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कोयत्याच्या हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलीस कॉलेजमध्ये पोहचले. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यात त्याच्यासोबत सहभागी असणारा दुसरा अल्पवयीन मुलगा फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे.

का केला कोयत्याने हल्ला

ज्या शिक्षणाच्या मंदिरात विद्यार्थी ज्ञान घेण्यासाठी येतात, त्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक महिन्यापूर्वी किरकोळ वाद झाला होता. हा वाद पार्किंगमध्ये गाडी लावण्यावरुन झाला होता. त्याचा राग मनात ठेवून हा कोयत्याने हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेतल्याचे सांगितले.

हे सुद्धा वाचा

खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर निशाणा

बारामतीमधील खुनाच्या प्रकरणानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेतले आहे. बारामतीमधील एका कॉलेजमध्ये दिवसाढवळ्या हत्या झाली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहे. गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांची भिती राहिली नाही. कोणीही कोयता, तलवार, पिस्तूल घेऊन दिवसाढवळ्या हत्या करत आहे. गृहमंत्री निष्क्रीय असून त्यांच्या काळात राज्यात गुंडाराज सुरु आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.