Pimpri Chinchwad crime| दिघीतील लॉजमध्ये आढळले पुरुष व महिलेचा मृतदेह

| Updated on: Nov 25, 2021 | 5:03 PM

लॉजवरील हाऊसकिपिंग दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. झोपले असतील असे समजून हाऊसकिपींग स्टाफनेही लक्ष दिले नाही. मात्र दुपार झाल्यानंतरही रूमचा दरवाजा न उघडला गेल्यानं लॉजमधील स्टाफला संशय आला.

Pimpri Chinchwad crime| दिघीतील लॉजमध्ये आढळले पुरुष व महिलेचा मृतदेह
crime
Follow us on

पिंपरी- शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. दिघी परिसरातील एका लॉजमध्ये महिला व पुरुषांचा मृतदेह आढळून आला आहे. प्रकाश ठोसर आणि वैशाली चव्हाण अशी मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे असून ते दोघेही काल या लॉजमध्ये वास्तव्यास आले होते.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की प्रकाश ठोसर व वैशाली चव्हाण यांचे गेल्या काही वर्षांपासून अनैतिकसंबंध होते. यामध्ये मृत वैशाली विवाहित होत्या तर प्रकाश हा अविवाहित होता. दोघेही पिंपरीतील अंजिठा नगर येथील रहिवाशी होते. घटनेच्या आदल्या दिवशी दोघेही दिघी येथील लॉजवर दुपारी साडे तीनच्या सुमारास आले. त्यानी तिथे रूम बुक केली. त्यानंतर पाण्याची बॉटल व खाण्याचे सामना घेऊन ते रूममध्ये गेले.

कामगाराला आला संशय

वैशाली व प्रकाश थांबलेल्या रूमचा दरवाजा दुसऱ्या दिवशी सकाळी उघडला नव्हता. लॉजवरील हाऊसकिपिंग दरवाजा ठोठावला मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. झोपले असतील असे समजून हाऊसकिपींग स्टाफनेही लक्ष दिले नाही. मात्र दुपार झाल्यानंतरही रूमचा दरवाजा न उघडला गेल्यानं लॉजमधील स्टाफला संशय आला. त्यांनी पोलिसांनी माहिती देत दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.

लॉज मालकाच्या फोननंतर पोलीस घटना स्थळावर दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडून आता प्रवेश केला.  तेव्हा त्यांना वैशालीचा जमिनीवर पडलेला तर प्रकाशाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थिती आढळून आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदानासाठी पाठवून दिले. पोस्टमार्टमचा अंतिम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत वैशालीचा पती तुरुंगात आहे. तर मृत प्रकाशवरही तीन गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप

‘साखरेला चांगले दिवस, ऊसाला 3700 रुपये भाव द्या’, राजू शेट्टींची नाशिकमधून मागणी; एसटी कर्मचाऱ्यांनाही महत्वाचा सल्ला

Nawab Malik| वानखेडेंच्या आई अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू?- मलिक