मावळ : मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे वर्षा सहली (Picnic)चा आनंद घेण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डी येथून आलेला एक युवक (Youth) पाण्यात वाहून गेल्या (Swept Away)ची घटना आज उघडकीस आली आहे. वैभव देसाई असं या तरुणाचे नाव आहे. तो मित्रासोबत कुंडमळा परिसरात आला होता. दोन तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे नदीचा प्रवाह प्रभावित झालेला असताना देखील ते पाण्यात उतरले होते. यावेळी प्रवाहात वैभव वाहून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे.
राज्यात सध्या पावसाने धूमशान घातले आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरुन वाहत आहे. पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला आहे. वैभव देसाई हा तरुण पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी येथील रहिवासी असून गुरुवारी तो मित्रासोबत कुंडमळा येथे पिकनिकला आला होता. यावेळी नदीत उतरुन दोघे मित्र मस्ती करत होते. यावेळी वैभवचा पाय घसरला आणि तो पाण्यात वाहून गेला. घटनेची माहिती समजल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक टीमचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले, मात्र अद्याप त्याचा शोध लागला नाही. (The youth was swept away in the Kundmala river of Maval)