पिंपरी- सांगवीतील काटेपुरम चौकात व्यवसायिक योगेश जगताप यांची गोळ्या घालत हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेतील दोन आरोपींना पकडण्यात सांगवी पोलिसांना यश आले आहे. अक्षय केंगले आणि गणेश ढमाले अशी अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.
नेमकं काय घडले?
काल शनिवार (दि. 18) रोजी सांगवीतील काटेपुराम चौकात सकाळी साडेदहा व्यवसायिक योगेश जगताप यांच्यावर दोन जअज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. या हल्ल्यात व्यावसायिक योगेश यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी झाडलेल्या सहा गोळ्यातील दोन गोळ्या त्यांना लागल्या यात जगताप गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठ्या फौजफाट्यासह पोलीस घटना स्थळावर हजर झाले. आरोपी यांनी जगताप यांच्यावर जुन्या भांडणाचा राग उकरून काढत हल्ला केला. यामध्ये पोलिसांनी गणेश मोटे व अश्विन चव्हाण या दोघांसह 11 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील दोघाना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने हत्या
सांगवीतील त्या परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या हेतूने संगनमत करुन हल्ल्याचा कट रचला. घटनेच्या दरम्यान योगेश दत्त जयंती निमित्त सुरु होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पाहत असताना गणेश मोटे व अश्विन चव्हाण तेथे आले. त्यांनी ‘ योग्या तुला आता जिवंत ठेवत नाही म्हणत पिस्तूल घेऊन त्यांच्यामागे धावले, त्यांच्या हातात पिस्तूल बघून योगेश यांनी पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी तब्बल सहागोळया झाडल्या. त्यातील दोन गोळ्या लागून योगश गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी आणखी एकाला पिस्तुलाचा धाक दाखवत त्याची दुचाकी घेतली व तेथून पळ काढला.
ठाण्यात राष्ट्रवादीचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे मारो!