बारामती (पुणे) : गेल्या महिन्यात दिवे घाटात एक नवरी मुलगी चारचाकी वाहनांच्या बोनेटवर बसून लग्नाला गेली होती. त्यावेळी गुन्हा दाखल झाल्याचे उदाहरण ताजे असतानाच आता पुन्हा पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर अतिउत्साही दोन युवक कारच्या बोनटवर बसून धोकादायक स्टंट करताना दिसून आले. तरुणांना यातून नेमकं काय साध्य करायचं आहे? यातून एखादी दुर्घटना घडली तर ते किती महागात पडू शकतं? असा सवाल काही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.
पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवरील चतुर्मुख मंदिर परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. त्याचबरोबर संबंधित भागात निसर्गरम्य परिसर असल्याने पर्यटनासाठी देखील अनेकजण येत असतात. दरम्यान, नुकतेच चतुर्मुख मंदिराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घाटामधून आतिउत्साही दोन युवकांनी चित्तथरारकरीत्या गाडीच्या बोनटवर बसून प्रवास केल्याचं समोर आलं आहे.
गाडी चालकाला पुढील काही भाग दिसत नसल्याने बोनटवरी एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने धोकादायकरित्या कार चालवून जीवघेणा प्रवास केल्याने सर्व भाविक त्यांच्या कृत्याकडे पाहतच राहिले. या अतिउत्साही युवकांना कायद्याच्या धाकाचाही विसर पडल्याचं या ठिकाणी पाहवयास मिळालं.
गाडीच्या बोनेटवर स्टंटबाजी #stunt pic.twitter.com/s1XtjA9mp4
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) August 16, 2021
काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्वेतील मलंगगड परिसरात काही तरुणांची अशीच स्टंटबाजी समोर आली होती. कारमध्ये जवळपास चार जण होते. ड्रायव्हर गाडी चालवत होता. तर एक तरुण बोनेटवर बसला होता. तर तीन तरुण कारच्या खिडकीमधून बाहेर डोकावत छतापर्यंत बाहेर आले होते. संबंधित स्टंटबाजीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांनी याप्रकरणी तरुणांवर गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा :
विवाहित प्रियकराचा लग्नास नकार, चिंचवडमध्ये प्रेयसीने लॉजवर बोलावून गळा आवळला
…आणि पोलिसांनी पोलीस ठाण्यातच गर्भवती तरुणीचं प्रियकरासोबत लग्न लावलं