देशात 15 ऑगस्टची तयारी सुरु झाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित अतिरेक्याला अटक केली आहे. त्या अतिरेक्यावर राष्ट्रीय तपास संस्थेनेही लाखोंचे बक्षीस ठेवले होते. रिजवान अली या खतरनाक दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनी अटक केली आहे. दिल्लीतील दर्यागंजमधून रिजवनच्या मुसक्या आवळल्या आहे. रिजवान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक व्हीआयपी परिसरांची रेकी केली होती.
15 ऑगस्टपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला मोठे यश मिळाले आहे. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या रिजवानवर एनआयएने तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. रिजवान हा पुणे इसिस मोड्युल सोबत जोडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनआयएकडून रिजवान अलीसंदर्भात इनपूट दिल्ली पोलिसांना मिळाले. त्यानंतर रात्री 11 वाजता बायोडायवर्सिटी पार्क येथे त्याला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी काही हत्यार देखील जप्त केली आहे. त्यात एक स्टार पिस्तूल, 3 कारतूस आणि 2 मोबाइल फोन जप्त केले आहे.
रिजवान पुणे आयएसआयएस मॉड्यूलमधील सर्वात धोकादायक अतिरेकी आहे. या मॉड्यूलमधून अनेकांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. परंतु रिझवान फरार होता. त्याने दिल्ली, मुंबईतील अनेक व्हिव्हिआयपी भागांची तपासणी केली होती. रिझवान याला एनआयएने मोस्ट वॉन्टेडच्या यादीत टाकले होते. त्याने आयईडी तयार करुन त्याची चाचणी केली होती. तो त्यातील तज्ज्ञही होता. अतिरेक्यांची स्पेशल सेल टीमकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.
रिजवान याला 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले होते. परंतु पुणे इसिस मॉड्यूलमधून त्यांचे कारनामे समोर आले. त्याला दिल्ली पोलिसींनी १५ ऑगस्टपूर्वीच अटक केली. आता त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्यातून काय माहिती मिळेल? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.