Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले, पुणे पोलीस आयुक्तांचा खळबळजनक खुलासा

| Updated on: May 27, 2024 | 11:14 AM

Pune Porsche Accident : पुणे हिट अँड रन प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीला वाचवण्यासाठी बल्ड सॅम्पल कसे बदलण्यात आले? ससूनच्या डॉक्टरांनी काय केलं? ते सर्व समोर आलय. पुणे पोलिसांनी या प्रकरणी आणखी दोघांना अटक केलीय. पुरावे नष्ट करण्यासाठी जे जे काही झालं, ते खूप धक्कादायक आहे.

Pune Porsche Accident : आरोपीचे ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्ब्यात फेकले, पुणे पोलीस आयुक्तांचा खळबळजनक खुलासा
pune case police
Follow us on

पुणे कल्याणी नगर हिट अँड रन प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकांनी या दोघांना पहाटे बेड्या ठोकल्या. अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे हा ब्लड रिपोर्ट बदलला गेला. थेट रक्तच बदलल्यामुळे या केसची दिशाच बदलण्याची शक्यता होती.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणात खळबळजनक खुलासे केले आहेत. “19 तारखेला 11 वाजता अल्पवयीन आरोपीचे सूसन हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आले होते. जे आरोपीचे ब्लड सॅम्पल घेतले, ते त्यांनी डसबीनमध्ये फेकून दिले. त्यानंतर दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेऊन डॉक्टरने सील केले व त्यावर आरोपीचे नाव लिहून फॉरेन्सिकला पाठवून दिले. डॉ. श्रीहरी हळनोर तिथे सीएमओ होते. त्यांनी हे सर्व ब्लड सॅम्पल बदलले. डॉ. अजय तावरे HOD आहेत, त्यांचाही सहभाग यामध्ये होता” अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

दुसऱ्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये ब्लड सॅम्पल घेतलेले

“त्याच रात्री औंधमध्ये दुसऱ्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आरोपीचे आणखी एक ब्लड सॅम्पल घेण्यात आले होते. डीएनए मॅचिंग हा त्यामागे उद्देश होता. आरोपीच्या वडिलांचे सुद्धा सॅम्पल घेण्यात आले होते. औंधमधील रुग्णालयात आरोपीची सॅम्पल वडिलांच्या नमुन्यासोबत मॅच झाली. सूसनची सॅम्पल मॅच होत नव्हती. त्यावरुन काहीतरी गौडबंगाल असल्याच पोलिसांच्या लक्षात आलं” अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करुन पोलीस कोठडी मागण्यात येईल. ससूनमधील सर्व सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येईल, असं पुणे पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

पोलिसांनी काय प्लानिंग केलेलं?

सुदैवाने पोलिसांनी दुसऱ्यांदा त्या मुलाचे ब्लड सॅम्पल घेऊन ठेवलेले होते आणि त्याची डीएनए चाचणी देखील करण्यात आली आहे. यातून हा सर्व प्रकार उघड झाला. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाईचे सविस्तर प्लॅनिंग केलं आणि तावरे व हरनोर या दोघांना पहाटे त्यांच्या घरामधून अटक केली. या कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले?

ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणात देखील ससून रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांचा कथित सहभाग उघड झाला होता. त्यानंतर देखील ससूनमध्ये हे गैरप्रकार सुरू आहेत. डॉ तावरे यांनी कल्याणी नगर अपघात प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी मदत केली आणि त्याचे ब्लड सॅम्पल बदलले. या बदललेल्या रक्ताचा अहवाल त्यांनी दिला. डॉ. तावरे आणि डॉ. हरनोर यांना यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे मिळाल्याची चर्चा आहे. या दोघांना कोणी संपर्क साधला? त्यांच्यापर्यंत पैसे कोणी पोहोचवले? याचा आता तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे.