सध्या एका महिला IAS ऑफिसरच्या पतीची सर्वत्र चर्चा आहे. हॉटेलमध्ये परदेशी महिलेसोबत अय्याशी करताना पोलिसांनी त्याला पकडलं. प्रशासकीय वर्तुळात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. सराभा नगरच्या एका हॉटेलमधून सेक्स रॅकट चालवल जात असल्याची पोलिसांना सूचना मिळाली होती. इथे काही लोक परदेशी मुलींसोबत यायचे. खोट्या आयडीवर लोकांना खोल्या भाड्यावर दिल्या जायच्या. शुक्रवारी स्थानिक पोलिसांना माहिती मिळाली होती की, काही लोक परदेशी मुलीसोबत हॉटेलमध्ये आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा लुधियानाच्या पंजाब एग्रीकल्चर यूनिवर्सिटी गेटच्या समोर असलेल्या हॉटेलवर छापा मारला. तिथून दोन पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतलं. पंजाबच्या लुधियानामधील ही घटना आहे. यामुळे प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
चौकशीत पोलिसांना समजल की, ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची पत्नी पंजाबमध्ये IAS अधिकारी आहे. पोलिसांना त्यांना फोन करुन माहिती दिली. त्यावेळी पत्नीने आरोपींविरोधात गुन्हा दाखल करायला सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी याच भागात चालणाऱ्या एका हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पदार्फाश केला होता. पोलिसांना माहिती मिळाली होती की, सराभा नगर भागात एका स्पा सेंटरच्या आडून सेक्स रॅकट चालवल जात असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी छापा मारल्यानंतर बऱ्याच गोष्टी उघड झाल्या होत्या.
स्पा सेंटरवर छापा मारला
अँटी नारकोटिक्स सेल आणि पोलिसांच्या संयुक्त टीमने मिळून स्पा सेंटरवर छापा मारला होता. पोलिसांनी घटनास्थळावरुन मो दिलशाद, राशिद, मॉडल टाउन एक्सचा गुरमनप्रीत सिंह, मेहरबानचा सोहम कुमार, पुनीत नगरचा अमित वर्मा, थरीकेची पल्लवी हांडा आणि अमृतसरच्या किरतप्रीत कौर यांना अटक केली होती.