Terrorist Arrest | पोलिसांना मोठं यश, दहशतवादाच मॉड्युल उधळलं, काही करण्याआधीच 4 अतिरेक्यांना अटक

| Updated on: Oct 28, 2023 | 1:20 PM

Terrorist Arrest | कोणी रचलेल कारस्थान?. काय प्लानिंग होतं?. या दहशतवाद्यांना भारतात मदत कशी पोहोचली?. भारताला हादरवून सोडण्याचा कट रचण्यात आला होता. पोलिसांनी दहशतवादाच एका मॉड्यूल उधळून लावलय. पोलिसांनी तात्काळ ऑपरेशन करुन चौघांना अटक केली.

Terrorist Arrest | पोलिसांना मोठं यश, दहशतवादाच मॉड्युल उधळलं, काही करण्याआधीच 4 अतिरेक्यांना अटक
Terror Modul Busted
Follow us on

मोहाली : भारतात दहशतवादी कारवाई करण्याचा एक मोठा कट उधळला गेलाय. मोहालीमधून बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. पंजाबला हादरवून सोडण्यासाठी या दहशतवाद्यांना पाठवण्यात आलं होतं. पंजाबची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी या लोकांना काही जणांच्या टार्गेट किलिंगची जबाबदारी सोपवण्यात आली होती. या दहशतवाद्यांच कनेक्शन थेट पाकिस्तानशी जोडलेलं आहे. मोहालीत बब्बर खालसा इंटरनॅशनलचे चार दहशतवादी लपले होते. पंजाब पोलिसांना गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली होती. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर 4 दहशतवादी असल्याची माहिती समोर आली. पंजाब पोलिसांनी तात्काळ ऑपरेशन करुन चौघांना अटक केली. दहशतवाद्यांकडे काही संशयास्पद वस्तू आणि नाव मिळाली आहेत. टार्गेट किलिंगची जबाबदारी या दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली होती.

हे दहशतवादी थेट पाकिस्तानात लपून बसलेला दहशतवादी हरविंदर रिंदाच्या संपर्कात होते. तो तिथून या दहशतवाद्यांची मदत करत होता. हरविंदर रिंदा ISI च्या मदतीने या दहशतवाद्यांना शस्त्र आणि आर्थिक मदत पोहोचवत होता. पोलिसांनी या दहशतवाद्यांकडून 6 पिस्तुल आणि 275 जिवंत काडतूस हस्तगत केली आहेत. पाकिस्तानातून ड्रोनच्या मदतीने त्यांना शस्त्र आणि आर्थिक मदत पोहोचवली जात होती.

सोशल मीडिया हँडलवर दोन पोस्ट

पंजाब पोलिसांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या बातमीची पृष्टी करताना दोन पोस्ट केल्या आहेत. राज्यात कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंजाब पोलिसांनी सांगितलं. पंजाबमध्ये बॉर्डरजवळ ड्रग्स आणि शस्त्रास्त्र ड्रोनच्या माध्यमातून पोहोचवली जायची. पोलिसांनी अनेकदा हा प्रयत्न उधळून लावलाय. सध्या या दहशतवाद्यांची चौकशी सुरु आहे.