पुणे : पुण्यातले शिवसेना नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) आरोप प्रकरण वळणावर वळणं घेत आहे. कारण आधी त्या तरूणीने रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जबरदस्तीने ते आरोप करायला लावल्याचे म्हटलं. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यानंतर या चित्रा वाघ यांच्यावर टीकेची झोड उडवली मात्र काही वेळात चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच त्या तरुणीचे माझ्या मेसेज (Massage) आहेत. पोलिसांनी माझा सीडीआर काढावा, त्या तरुणीने जी माहिती मला दिली. त्यावरून ती एकटी लढतेय. तिच्यावर अत्याचार होतोय, म्हणून मी तिच्या सोबत उभी राहिली. आणि आता हे माझ्यावर असे आरोप करत आहेत. मात्र मी गप्प बसणार नाही. माझं काम सुरूच राहणार आहे. मी अशी प्रकरणं सर्वासमोर आणतच राहणार असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. मात्र पुन्हा या प्रकरणात नवं ट्विस्ट आलं, कारण चित्रा वाघ यांच्या पत्रकार परिषदेनंतर काही वेळात पुन्हा त्या तरुणीने चित्रा वाघ पत्रकार परिषदेत खोटं सांगत असल्याचं म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप खोटे आहेत, असे पुन्ही पीडित तरुणीने सांगितलं आहे. पोलिसांनी माझी चौकशी करावी, सीडीआर काढावेत, आणि चित्रा वाघ यांचीही चौकशी करावी, असे थेट आव्हानही तिने दिले आहे. तसेच चित्रा वाघ फेसकॉलवर माझ्याशी बोलायच्या, आणि मला मेसेज पाठवायला लावायच्या, असा आरोप पुन्हा तिने केला आहे. त्यांनी जे मेसेज वाचून दाखवले ते त्यांनीच मला पाठवायला सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच मी त्यांना मेसेज पाठवत होते, असा आरोपही या तरुणीने केला आहे.
तर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. कोणताही विचार न करता राजकारण केलं गेलं. पीडितीला कुणी मदत केली नाही हा चुकीचा आरोप आहे. अशा घटना घटल्या त्यावेळी पोलिसांनी दखल घेतली आहे. दिरंगाई झाली असेल तर लक्ष घालणं सर्वाचं काम आहे. मात्र चित्रा वाघ या रोज ज्या वेगवेगळ्या गोष्टी वाहिन्यांवर बोलत होत्या त्याचा मुलीवर काही परिणाम झाला आहे का? याचीही माहिती घेतली पाहिजे. तसेच पीडितीने जबाब का बदलला हे तपासात समोर येईलच. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या प्रकरणात लक्ष घातलतील, असा इशाराही त्यांनी दिला. तसेचत मुलींचा असा वापर करणं हे चुकीचं आहे. आपण न्यायव्यवस्था आहोत हे सांगणं चुकीचं आहे. शक्ती कायद्यात तरतुद करण्यात आली की खोटी माहिती देणाऱ्यांनाही शिक्षा होऊ शकते, मात्र माझ्या विधानाचा वापर करून आता तिच्यावर दबाव आणू नये, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
Chitra Wagh : मदत करणं हे जर चूक असेल तर मी ही चूक केलीय, चित्रा वाघ म्हणतात पोलिसांनी माझा सीडीआर…
Pune Toll | पुणे सातारा महामार्गावर प्रवास महाग, खेड शिवापूर नाक्यावर 8 टक्क्यांनी टोलवाढ