महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर होते. अकोल्यात असताना त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत चोरट्यांनी हात साफ केले. चोरट्यांनी मनसेचे शहराध्यक्ष राकेश शर्मा आणि आणि जिल्हाध्यक्ष राजेश काळे त्यांचा खिसा कापला. त्यांच्यासोबत आलेल्या सुरक्षा रक्षकांचा आयफोन लांबवला. यामुळे या बैठकीपेक्षा चोरट्यांनी केलेल्या सफाईची चर्चा सुरु होती. राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध उमेदवार देणार असल्याचे या दौऱ्यात सांगितले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे अकोल्यात आले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकार यांचे 31 जुलै रोज ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांच्या परिवाराची राज ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी शुभ मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत चोरट्यांनी सफाई सुरु केली.
राज ठाकरे यांच्या बैठकीत भुरटे चोरटे घुसल्याचे स्पष्ट झाले. मनसे पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. राज ठाकरे यांनी बैठकीत विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. तसेच अकोला जिल्ह्यातून कोण कोणत्या मतदार संघातून उमेदवार देता येणार? त्यासंदर्भात कार्यकर्त्यांशी चर्चा केली.