नवरा अचानक बेडरुममध्ये आला. समोरच दृश्य पाहून त्याला आपल्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. नवऱ्याचा संयम सुटला. तो इतका चिडला की, त्याने किचनमधन चाकू उचलला. आधी पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. ती जखमी होऊन खाली कोसळली. त्यानंतर एक युवक त्याच्या हाताला लागला. त्याला महिलेच्या पतीने पकडलं. त्याने चाकूने या युवकावर सपासप वार केले. राजस्थानच्या बारामधील हे प्रकरण आहे. पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा केला आहे. घरात एका विवाहित महिलेच मृतदेह आढळला. सोबत रक्ताच्या थोराळात कोसळलेला एक युवक होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीनेच दोघांची हत्या केली. आरोपी पतीने त्यांच्या बेडरुममध्ये पत्नीला पाच मुलांसोबत दारु पार्टी करताना पकडलं.
बेडरुममध्ये पत्नीला पाच मुलांसोबत पाहून नवऱ्याच नियंत्रण सुटलं. तो प्रचंड भडकला. त्याने किचनमधून चाकू उचलला. आधी पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. मग पाचही युवकांकडे वळला. चार युवक तिथून निसटण्यात यशस्वी ठरले. एक युवक त्याच्या हाताला लागला. त्याचा मृत्यू झाला आहे. आरोपी हत्या करुन तिथून पसार झाला. आरडाओरडा ऐकून आसपासचे लोक तिथे जमा झाले. त्यांनी रक्ताच्या थोराळ्यात कोसळलेली महिला आणि युवकाला पाहून पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तपासल्यानंतर समजलं की, महिलेचा मृत्यू झाला. युवकाचा श्वास सुरु होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला.
सर्व अँगलने चौकशी
धाकखेडी गावच हे प्रकरण आहे. फरार झालेले सर्व युवक कोटाचे राहणारे आहेत. पोलीस या प्रकरणाची सर्व अँगलने चौकशी करत आहेत. डबल मर्डरचे हे प्रकरण प्रेम प्रकरणाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. पोलीस उपधीक्षकांनी सांगितलं की, धाकडखेडी गावात भांडण झाल्याची माहिती मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी एक महिला आणि युवक रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. महिलेच वय 30 च्या आसपास तर युवक 20 वर्षांचा होता. हा युवक कोटाचा रहाणारा आहे. गौरव सिंह हाडा त्याचं नाव आहे. दोघांच्या शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केल्याचे निशाण आहेत.