भरतपुर | 26 सप्टेंबर 2023 : पोलिसांना आपण देव मानतो. पोलीस वाईट आणि असामाजिक घटकांपासून जनतेचं संरक्षण करतात. त्यामुळे पोलिसांकडून आपल्याला चांगल्या गोष्टींची अपेक्षा असते. सर्वसामान्य जनतेच्या याच अपेक्षांना पायदडी तुडवणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याचे कूकृत्य समोर आले आहेत. या पोलीस अधिकाऱ्याला सध्या निलंबित करण्यात आलंय. पण संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी सरकारी क्वार्टरमध्ये अशाप्रकारचं कृत्य करुच कसा शकतो? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय.
संबंधित घटना ही राजस्थानच्या भरपूर शहरातील आहे. भरपूरमधील पोलीस अधिकाऱ्याचा एका महिलेसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत संबंधित पोलीस अधिकारी हा आपत्तीजनक परिस्थितीत आहे. पोलीस अधिकाऱ्याने आपल्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सरकारी क्वार्टरमध्ये हे सर्व कृत्य केल्याचा आरोप आहे.
कमरुद्दीन खान असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. तो कैथवाडा पोलीस ठाण्याचा प्रभारी म्हणून कार्यरत होता. आपण इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहोत, याची जाणीव या पोलीस अधिकाऱ्याला असायला हवी होती. या पोलीस अधिकाऱ्याचा एका महिलेला किस करतानाचा फोटो सोसश मीडियावर व्हायरल झालाय.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकारी कमरुद्दीन खान याने एका दलालाच्या माध्यमातून या महिलेला सरकारी क्वार्टरमध्ये आणलं होतं. कमरुद्दीनने इथे महिलेसोबत नको ते कृत्य केलं. या दरम्यान त्याने आपत्तीजनक परिस्थित असताना महिलेला किस करतानाचा फोटो आपल्याच मोबाईलमधून काढला. हाच फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पोलीस अधिकारी कमरुद्दीन खानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलीस दलात एकच खळबळ उडाली. संबंधित घटनेची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक बृजेश ज्योती उपाध्याय यांनी घेतली. त्याच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी सुरु आहे.
दरम्यान, कॅबिनेट मंत्री विरेंद्र सिंह यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली. असे प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांची छवी खराब होते. त्यामुळे कमरुद्दीन खानचा व्हायरल फोटो पोलीस महांचालकांना पाठवला आहे, असं विरेंद्र सिंह यांनी सांगितलं.