जोधपूर : राजस्थानमध्ये पोलिसांनी दारूच्या नशेत कार चालवणाऱ्या तरुणाचे चालान कापले. ही गोष्ट काँग्रेसच्या एका महिला आमदारापर्यंत पोहोचली आणि ती पोलिस ठाण्यातच धरणे आंदोलनाला बसली. आमदार मीना कंवर म्हणाल्या की “काही फरक पडत नाही, मुलांनी थोडे जास्त प्यायले आहे, मग काय गुन्हा होता?”
काय आहे प्रकरण?
काँग्रेस आमदार मीना कंवर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. राजस्थानातील शेरगढ विधानसभेच्या काँग्रेसच्या आमदार मीना कंवर पती उमेद सिंह चंपावत यांच्यासोबत धरणे आंदोलनावर बसल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. खरंतर, आंदोलनामागचे कारण पोलिसांनी चालान कापले जात असल्याचे सांगितले जात आहे.
आमदाराचे पोलीस ठाण्यात आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या युवकाचे चालान पोलिसांनी कापले आहे, तो काँग्रेसच्या आमदार मीना कंवर यांचा नातेवाईक आहे. नातेवाईकाचे चालान कापले जात असल्याने संतप्त झालेल्या आमदार मीना कंवर यांनी पोलिस ठाण्यातच धरणे सुरू केले आणि पोलिसांशी वादही घातला.
काय म्हणाल्या आमदार?
काँग्रेसच्या आमदार मीना कंवर यांनी पोलिसांना सांगितले की “तुम्ही माणुसकीने बोला. आम्ही तुम्हाला रात्री विनंती केली आहे. सगळ्यांची मुले पितात, काही हरकत नाही, मुलांनी थोडी जास्त घेतली, मग काय गुन्हा होता?”
प्रकरण वाढत असताना पाहून डीसीपीला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर प्रकरण शांत झाले आणि आमदार तिचा पती आणि नातेवाईकासह पोलीस ठाण्यातून घरी गेले.
पाहा व्हिडीओ :
Congress MLA Meena Kanwar of Shergarh and her husband former MLA Umaid Singh sat on a dharna at Ratanada police station to prevent the challan of the relative- says sabhe bacche peete hai to kya!
THIS IS WHY THE LAW AND ORDER OF RAJASTHAN IS TERRIBLEhttps://t.co/71eQ4acOpv pic.twitter.com/HtMlAp0nmQ
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) October 19, 2021
संबंधित बातम्या :
VIDEO | बायकोशी भांडणातून स्वतःचं घर पेटवलं, आजूबाजूची दहा घरं जळून खाक, ग्रामस्थांनी धू-धू धुतलं