प्रेयसीचा साखरपुडा, लॉजमध्ये बोलावून प्रियकराकडून चाकूचे वार, नंतर रेल्वेखाली उडी

| Updated on: Sep 08, 2021 | 12:52 PM

मयत तरुणी लक्षिता ही पाली जिल्ह्यातील सोजत रोडची रहिवासी होती. ती जोधपूरमधील एका वसतिगृहात राहून कायद्याचे शिक्षण घेत होती, तर तिचा प्रियकर हेमंत हा नागौर जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचा कपड्यांचा व्यवसाय होता

प्रेयसीचा साखरपुडा, लॉजमध्ये बोलावून प्रियकराकडून चाकूचे वार, नंतर रेल्वेखाली उडी
साखरपुडा झाल्याने प्रेयसीची हत्या
Follow us on

जयपूर : प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना राजस्थानच्या जोधपूरमधून समोर आली आहे. चाकूने दहा वेळा वार करुन प्रियकराने तरुणीचा जीव घेतला. त्यानंतर रेल्वेसमोर उडी घेत तरुणाने स्वतःचं आयुष्यही संपवलं. प्रेयसीने साखरपुडा केल्यामुळे आरोपी प्रियकर नाराज असल्याची माहिती आहे.

आदल्या रात्री हॉटेलमध्ये थांबले

मयत तरुणी लक्षिता ही पाली जिल्ह्यातील सोजत रोडची रहिवासी होती. ती जोधपूरमधील एका वसतिगृहात राहून कायद्याचे शिक्षण घेत होती, तर तिचा प्रियकर हेमंत हा नागौर जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचा कपड्यांचा व्यवसाय होता. दोघेही सोमवारी रात्री जोधपूरमधील जालोरी गेट येथील सिद्धिविनायक लॉजमध्ये थांबले होते.

प्रियकराचा मृतदेह रेल्वेने कापलेल्या अवस्थेत

मंगळवारी सकाळी हेमंतचा मृतदेह मंडोर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेने कापलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर मंडोर पोलिसांना माहिती देण्यात आली. हेमंतच्या खिशातील ओळखपत्रातून तो नागौरचा रहिवासी असल्याचे उघड झाले.

प्रेयसीवर दहा वेळा चाकूने वार

त्याच संध्याकाळी सिद्धिविनायक हॉटेलच्या खोलीत संशयास्पद अवस्थेत एक मृतदेह आढळला. माहिती मिळताच सरदारपुरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र दरवाजा बंद होता. दरवाजा तोडल्यानंतर पोलीस आत गेले तेव्हा 25 वर्षीय लक्षिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. पोलिसांनी या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. मृतदेहाचे शवविच्छेदन करुन कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

सात दिवसांपूर्वी तरुणीचा साखरपुडा

गर्लफ्रेंड लक्षिताचा 7 दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला होता. ती जोधपूरच्या वसतिगृहात राहून कायद्याचे शिक्षण घेत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हेमंत आणि लक्षिता यांचे गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र तिने अन्यत्र साखरपुडा केल्यामुळे हेमंत नाराज असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन तपास सुरू केला आहे.

लग्नाचा तगादा लावल्याने नंदुरबारमध्ये तरुणीची हत्या

दरम्यान, नंदुरबार परिसरातील बिलाडी शिवारात रेल्वे रुळाजवळ सापडलेल्या युवतीच्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या आधाराने हत्या प्रकरणातील आरोपीला गुजरात राज्यातून अटक करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी एका अनोळखी महिलेचा मृतदह रेल्वे रुळाजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. लग्नाचा तगादा लावल्यानेच तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या केल्याचं समोर आलं आहे.

कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय

दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे. ती त्याच परिसरात घरकाम करते. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. जालना जिल्ह्यात राहणारा लक्ष्मीचा पती आणि संशयित जनार्दन मोहिते सध्या बेपत्ता आहे

संबंधित बातम्या :

मंदिरात जाताना पहाटे धारदार शस्त्राने हत्या, विरारच्या बिल्डरच्या हत्येचं गूढ उलगडलं

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ