जयपूर : स्पा सेंटरच्या (spa center) नावाखाली चालणाऱ्या देह व्यापाराचा पोलिसांनी पर्दाफाश केला. राजस्थान (Rajasthan) मधील बारमेर जिल्ह्यातील बालोतरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने धाड टाकत कारवाई केली. यावेळी दोन तरुणींसह एकूण चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरवर छापा पडणार असल्याची कुणकुण स्पा सेंटरच्या संचालकाला आधीच लागली होती. त्यामुळे त्याने थेट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवरुन संपर्क साधून कारवाई टाळण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी छापेमारी करत त्याचा खेळ खल्लास केला. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात स्पा सेंटरच्या आडून वेश्या व्यवसाय फोफावताना दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पा सेंटरमध्ये देह व्यापार सुरु असल्याची टिप त्यांना दुपारी दीड वाजताच्या सुमारास मिळाली. त्यावर पोलिसांनी एका बोगस ग्राहकाला नवीन बस स्थानकाच्या जवळील ए-वन स्पा सेंटरमध्ये पाठवले आणि त्याने इशारा करताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. स्पा सेंटरवर छापा टाकत उपअधीक्षकांनी दोन मुली आणि दोन मुलांना अटक केली. सर्वांविरुद्ध पीटा कायद्याच्या अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
उपअधीक्षक धन फुल मीना यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारमेर जिल्ह्यात स्पा सेंटरच्या नावाखाली देह व्यापार सुरू होता. त्यानुसार ए-वन स्पा सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये दोन मुलींसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. स्पा सेंटरवर केलेल्या कारवाईची माहिती यापूर्वीच लीक झाली होती. ज्याची माहिती ऑपरेटरला आधीच मिळाली होती. त्यानंतर स्पा ऑपरेटर उपअधीक्षकांवर फोनवर बोलण्यासाठी वारंवार दबाव टाकत होता. त्यावर उपअधीक्षकांनी स्पा ऑपरेटरला खडसावले
संबंधित बातम्या :
स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय, छाप्यात दहा जणी सापडल्या, ‘चौघीं’चं झालेलं लिंगबदल
75 बांग्लादेशी मुलींशी लग्न, दोनशे जणींना देह व्यापारात ढकललं, मुंबई-पुण्यासह देशभरात जाळं
पिंपरीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, तीन महिलांची सुटका