जयपूर : बहुमजली हॉटेलच्या इमारतीतून तरुणीने उडी मारुल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानमधील जोधपूर शहरात हा प्रकार घडला आहे. उंच बिल्डिंगमधून उडी मारणाऱ्या तरुणीचं नाव गुनगुन उपाध्याय (Gungun Upadhyay) असल्याची माहिती आहे. गुनगुन ही नवोदित मॉडेल असल्याचं समोर आलं आहे. गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली. टोकाचं पाऊल उचलण्याआधी तिने फक्त माझा चेहरा पहा, असं वडिलांना फोन करुन सांगितलं होतं. मात्र तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जोधपूर शहरातील रातानाडा भागात रविवारी ही घटना घडली. गुनगुन ही थान भागात राहणारे व्यापारी गणेश उपाध्याय यांची मुलगी आहे. रविवारी रात्री ती हॉटेल लॉर्ड्समध्ये थांबली असताना हा प्रकार घडला. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुनगुन उपाध्याय मॉडेलिंग करते. ती शनिवारी उदयपूरहून जोधपूरला आली होती. जोधपूरला आल्यानंतर तिने वडिलांना फोन करुन आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. फक्त माझा चेहरा पहा, असं तिने वडिलांना सांगितलं. त्यानंतर वडील गणेश उपाध्याय यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.
एसीपी देरावर सिंह यांनी फोन नंबरच्या आधारे गुनगुनचे लोकेशन शोधून काढले. त्यानंतर पोलीस रातानाडा परिसरातील हॉटेलवर पोहोचले. त्याआधीच गुनगुनने हॉटेलच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारली होती. खाली पडताच ती बेशुद्ध झाली, मात्र तिला तातडीने मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, गुनगुनच्या छातीसोबतच तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. सध्या तिची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. मात्र तिने आत्महत्येचा प्रयत्न का केला याची माहिती समोर आलेली नाही. गुनगुन उंचावरुन खाली पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. गुनगुनचे वडील जोधपूरमधील बाजारात व्यापारी आहेत. गुनगुन अद्याप काहीही सांगण्याच्या स्थितीत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. शुद्धीवर आल्यानंतरच तिने टोकाचं पाऊल का उचललं, याची कारणे स्पष्ट होतील.
संबंधित बातम्या :
मुलांचा फुटबॉल विहिरीच्या दिशेने गेला अन् बेपत्ता पोलीसाचा शोध लागला,औरंगाबादेत खळबळ!
पतीच्या बर्थडेनिमित्त हॉटेलात जेवायला, पुण्यात विवाहितेवर पाच जणांचा गँगरेप
‘माझ्या नादी लागाल, तर करीन 302’ म्हणणारी अखेर अटकेत! सोशल मीडियावरची गुंडगिरी भोवली