नवऱ्याने बायकोच अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदवला होता. पण प्रकरण कोर्टात पोहोचल तेव्हा पत्नीने सांगितलं की, तिच अपहरण झालेलं नाही. मी माझ्या मर्जीने दुसऱ्याव्यक्तीसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच तिने सांगितलं. ज्या विरोधात तिच्या पतीने कोर्टात खटला दाखल केला. हायकोर्टाने यावर असं म्हटलय की, हा कायदेशीर गुन्हा नाही. दोन वयात आलेल्या व्यक्ती विवाहबाह्य संबंध ठेवत असतील, तर तो कायद्याने गुन्हा ठरत नाही असं राजस्थान हाय कोर्टाने म्हटलय. न्यायाधीश बीरेंद्र कुमार म्हणाले की, “आयपीसीच कलम 494 इथे लागू होत नाही. कारण नवरा आणि बायको दोघांपैकी एकाने दुसरा विवाह केलेला नाही. विवाह झाल्याच सिद्ध होत नाही, तो पर्यंत लिव-इन-रिलेशनशिप सारख्या नात्याला कलम 494 लागू होत नाही”
पत्नीच अपहरण केलं म्हणून नवऱ्याने कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर पत्नीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं. माझ कोणीही अपहरण केलेलं नाहीय. मी माझ्या मर्जीने आरोपी संजीवसोबत लिव-इन रिलेशनशिपमध्ये राहतेय. त्यावर न्यायालयाने असं म्हटलं की, आयपीसीच्या कलम 366 अंतर्गत हा गुन्हा नाहीय. एफआयआर रद्द करण्यात येत आहे.
शारीरिक संबंध फक्त वैवाहिक जोडप्यांमध्ये असतात, पण….
सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या वकिलाने दावा केला की, महिलेने मान्य केलय की, संजीवसोबत तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे आयपीसीच्या कलम 494 आणि 497 अंतर्गत हा गुन्हा आहे. वकिलाने सामाजिक नैतिकतेच्या रक्षणासाठी न्यायालयाला आपल्या अधिकाराचा वापर करण्याची विनंती केली. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा हवाला देताना सिंगल बेंचने म्हटलं की, ” हे खरं आहे की, आपल्या समाजात असं मानल जातं की, शारीरिक संबंध फक्त वैवाहिक जोडप्यांमध्ये असतात. पण लग्नाव्यतिरिक्त दोन वयात आलेल्या व्यक्ती परस्पर सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा ठरत नाही.
याचिकाकर्त्याच्या पत्नीने कोर्टात काय सांगितलं?
वयात आलेल्या दोन भिन्न लिंगी व्यक्तींमध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध हा गुन्हा नाहीय हे कोर्टाने स्पष्ट केलय. एक वयात आलेली महिला तिला वाटेल त्या व्यक्ती बरोबर लग्न करु शकते. तिच्या पसंतीच्या व्यक्तीसोबत राहू शकते. याचिकाकर्त्याच्या पत्नीने प्रतिज्ञापत्राद्वारे कोर्टात उत्तर दिलय की, तिने तिच्या मर्जीने घर सोडलं व संजीव सोबत राहतेय असं कोर्टाने म्हटलं.