हजारोंच्या खात्यामधील पैसे लंपास करणारे हॅकर्स पोलिसांच्या जाळ्यात, राजस्थानच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी

| Updated on: May 21, 2021 | 12:19 PM

राजस्थानच्या विशेष पथकाने सायबर हल्ला करुन हजारो लोकांच्या बँक खात्यांमधील कोट्यवधी पैसे लुबाडणाऱ्या तीन गुन्हेगारांना अटक केली आहे (Rajasthan Special Operation Group busted cyber fraud gang).

हजारोंच्या खात्यामधील पैसे लंपास करणारे हॅकर्स पोलिसांच्या जाळ्यात, राजस्थानच्या विशेष पथकाची मोठी कामगिरी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

जयपूर : राजस्थानच्या विशेष पथकाने मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी सायबर हल्ला करुन हजारो लोकांच्या बँक खात्यांमधील कोट्यवधी पैसे लुबाडणाऱ्या तीन गुन्हेगारांना अटक केली आहे. राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपने ही कमगिरी केली आहे. या कारवाईनंतर आरोपी कशाप्रकारे लोकांचे बँक अकाउंट हॅक करुन दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे, याबाबतची सविस्तर माहिती पोलिसांच्या हाथी लागली आहे. विशेष म्हणजे एक नायजेरियन नागरिक हा या रॅकटचा मास्टमाईंड असल्याचं तपासात समोर आलं आहे. तो दिल्लीत वास्तव्यास होता. त्यालादेखील पोलिसांनी अटक केली आहे (Rajasthan Special Operation Group busted cyber fraud gang).

राजस्थानच्या सहकारी बँकेच्या तक्रारीनंतर संबंधित प्रकार उघड

जालोर सहकारी बँकेच्या ग्राहकांच्या खात्यांमधून अचानक 86 लाख रुपये गायब झाल्याची माहिती समोर आली. बँकेने याबाबत पोलिसात तक्रार केली. आरोपींनी बँकेचं सर्व्हर हॅक करुन खातेधारकांची संपूर्ण माहिती गोळा केली होती. त्यानंतर त्यांनी खातेदारांचे मोबाईल नंबर आणि इतर गोपनीय माहिती मिळवून त्यांच्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे गोळा केले (Rajasthan Special Operation Group busted cyber fraud gang).

दोन तासात 86 लाख ट्रान्सफर

आरोपींनी जालोर सहकारी बँकेच्या 28 ग्राहकांच्या खात्यातून पैसे लंपास केले होते. विशेष म्हणजे त्यांनी अवघ्या दोन तासात 28 खातेदारांच्या खात्यातून तब्बल 86 लाख रुपये ट्रान्सफर केले. त्यांनी ज्या खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले ते खाते खोटे कागदपत्रे देऊन बनवण्यात आले होते. पोलिसांना आरोपींच्या अशा चार बँक खात्यांची माहिती मिळाली जे खोटे कागदपत्रे जमा करुन खोलण्यात आले होते.

आरोपींना बेड्या

पोलिसांनी याप्रकरणी दिल्लीचा रहिवासी राशिद, जालोरला राहणारा मुकेश विश्नोई आणि नायजेरियाचा नागरिक ओमारेडिन ब्राइट या आरोपींनी अटक केली आहे. नायजेरियाचा ओमारेडिन हा या सर्वांमागील मास्टमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. तो दिल्लीतील मालवीय नगर येथे राहत होता. राजस्थानच्या विशेष पथकाने त्याला दिल्लीतून अटक केली. विशेष म्हणजे आरोपींनी गुजरातच्या एका सहकारी बँकेतूनही 50 लाखांपेक्षा जास्त रुपये लंपास केले आहेत.

पोलीस तपासात महत्त्वपूर्ण माहिती उघड

आरोपी खोट्या कागदपत्रांच्या आधारे मोबाईल आणि सीम कार्ड विकत घ्यायचा. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर बँक खाते खोलायचा. देशभरातील बँकांचे सर्व्हर हॅक करायचा. त्यानंतर ज्या बँक खात्यांमध्ये जास्त पैसे आहेत अशा खात्यांमधील पैसे आपल्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करायचा. त्यानंतर ते पैसे आपल्या खात्यात ट्रान्सफर करुन ते खातं तो बंद करायचा. आरोपीने अशाप्रकारे आतापर्यंत एक हजार पेक्षा जास्त खातेदारांना लुबाडल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा : लॉकडाऊनचे नियम मोडून फार्महाऊसवर पार्टी, दारु पिवून मजा-मस्ती, देहविक्रीचा धंदा, पुण्यातील संतापजनक प्रकार