रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून (Lanja Taluka, Ratnagiri District) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकीकडे राज्यातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सातत्यानं ऐरणीवर येतो आहेच. अशातच आता तर चक्क एका शाळेतील मुख्याध्यापकानेच (Principal) शाळेतील विद्यार्थीनीवर अतिप्रसंग करण्यात आल्याची घटना समोर आलीय. या मुख्याध्यापकाविरोधात विद्यार्थीनीच्या पालकांनी पोलिसात तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर इतरही सहा मुली पुढे आल्या आहेत. त्यांनी देखील मुख्याध्याकांवर गंभीर आरोप केलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गणावे केंद्र शाळा क्रमांक एकमध्ये हा प्रकार घडला. लैंगिक अत्याचार (Girl molestation & Rape) केल्याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात पोलिसांनी गुन्दा नोंदवला आहे. सहावीमध्ये शिकणाऱ्या एका मुलीवर शिक्षकानंच लैंगित अत्याचार केल्याची तक्रार या विद्यार्थीनीच्या पालकांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्याध्यापकानं आणखी सहा मुलींवर असाच अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आलाय.
रत्नागिरीत जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून समोर आलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तर शाळेतील शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यापासून मुख्याध्यापक फरार झालाय. सध्या पोलिसांकडून फरार मुख्याध्यापकाचा शओध सुरु आहे.
इयत्ता सहावीतील्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या मुख्याध्यापकाचं नाव नथू शामू सोनवणे आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध लागलेला असून पोलिसांनी त्यासाठी पथकं रवाना केली आहे.
लांजा पोलीस या मुख्याध्यापकाच्या राहत्या घरी म्हणजेच लांजा रेस्ट हाऊस इथं जाऊन आले. मात्र हे घर बंद असून तो फरार असल्याचं चर्चा आहे. 24 एप्रिल रोजी गावातील लोकांनी मुख्याध्यपकाविरोधात तक्रार देण्याचा रेटा लावला होता. त्यानंतर अखेर पोलिसांनी या मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा नोंद केलाय. ही घटना उघडकीस आल्यानंतर गावातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केलाय.