रत्नागिरी : रत्नागिरी पोलिसांनी उच्चभ्रू वस्तीमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय (Ratnagiri Sex Racket Busted By Police). रत्नागिरीतील ओसवाल नगर येथे भाड्याच्या बंगल्यात हे सेक्स रॅकेट सुरु होते. रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केलीय (Ratnagiri Sex Racket Busted By Police).
स्थानिक गुन्हे शाखेला या रॅकेट संदर्भातील टीप मिळाली होती. त्यानुसार, गुरुवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेनं सापळा रचला. यासाठी बनावट गिऱ्हाईक तयार करण्यात आले. या बनावट गिऱ्हाईकाच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करण्यात आला.
त्यानंतर पोलिसांनी ओसवाल नगर येथील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका पीडित तरुणीची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका महिलेसह दोघांना पोलिसांनी अटक केलीय. यांच्याकडून काही मोबाईल, रोख रक्कम देखील जप्त केली गेलीय.
ओसवाल नगर येथील बंद बंगल्यात हे सेक्स रॅकेट सुरु होते. शहरातील रिकामे बंगले हेरुन ते भाड्याने घेवून त्या ठिकाणी हे सेक्स रॅकेट सुरु होते. यात शहरातील काही एजंट म्हणून काम करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, या प्रकरणात आता पोलीस मुळापर्यंत जाणार का हा प्रश्न आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा ,पोलीस उपनिरीक्षक विनायक नरवणे, रेखा जाधव, कर्मचारी सुभाष भागणे, अमोल भोसले, बाळू पालकर, मिलींद कदम, अरुण चाळके ,राकेश बागुल , सत्यजित दरेकर, नितीन डोमने, प्रवीण खांबे, वैष्णवी यादव, दत्ता कांबळे, संजय जाधव यांनी ही कामगिरी केली.
ओळखीच्या मुलानेच केला घात, भाईंदरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारhttps://t.co/bQvtjBi6ts#minor | #thane
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
Ratnagiri Sex Racket Busted By Police
संबंधित बातम्या :
आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियाला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; कोर्टाकडून 2 मार्चपर्यंत कोठडी