Extramarital affair | शिल्पा विद्यार्थी शकीलच्या प्रेमात पडली, मग नवऱ्याला संपवण्यासाठी असं रचल भयंकर कारस्थान

| Updated on: Oct 21, 2023 | 10:11 AM

Extramarital affair | त्या मुलाने परदेशात जाण्यासाठी कोचिंग क्लास लावला होता. शिल्पा त्याच्या प्रेमात पडली. दोघांच्या कॅफेमध्ये भेटीगाठी वाढल्या. मधुर संबंध निर्माण झाले. त्यातून एक भयंकर कारस्थान जन्माला आलं. नवरा, कुटुंबाचा सुद्धा सुद्धा तिला विसर पडला.

Extramarital affair | शिल्पा विद्यार्थी शकीलच्या प्रेमात पडली, मग नवऱ्याला संपवण्यासाठी असं रचल भयंकर कारस्थान
Wife murder husbund with help of lover
Follow us on

जयपूर : कोचिंग क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याबरोबर सूत जुळल्यानंतर एका महिलेने धक्कादायक पाऊल उचललं. या महिलेच लग्न झालं होतं. तिच नाव शिल्पा खेमका आहे. कोचिंग क्लासला येणारा विद्यार्थी मोहम्मद शकीलवर तिचा जीव जडला. दोघे परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडाले. शिल्पाला, तर आपला नवरा, कुटुंब आहे याचा सुद्धा विसर पडला. शिल्पा मोहम्मद शकीलच्या प्रेमात इतकी बुडाली की, नवऱ्याचा तिला अडसर वाटू लागला. यातूनच एक भयानक कारस्थान जन्माला आलं. ज्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. शिल्पा खेमका या कोचिंग क्लासमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून नोकरीला होती. याच दरम्यान तिची मोहम्मद शकीलबरोबर ओळख झाली. शकील आणि शिल्पा दोघांच्या कॅफेमध्ये भेटीगाठी वाढू लागल्या. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. नवरा वाटेत अडथळा ठरत असल्यामुळे तिने त्याला मार्गातून हटवण्याचा निर्णय घेतला.

मोहम्मद शकीलला परदेशात जायच होतं. त्यासाठी त्याने तिथे क्लास लावलेला. राजस्थानच्या हनुमानगढमधील हे प्रकरण आहे. शिल्पाने या गुन्ह्यामध्ये प्रियकराच्या मित्राची मदत घेतली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं की, शिल्पाने नवऱ्याची हत्या करण्यासाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. तिने आधी नवऱ्याच्या दूधात झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर नवरा गाढ झोपेत असताना प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलवून नवऱ्याची हत्या केली.

शिल्पाच काय प्लानिंग होतं?

शिल्पाने कोचिंग क्लासमधला तिचा प्रियकर आणि त्याच्या एका मित्रासोबत मिळून हे कारस्थान प्रत्यक्षात आणलं. शिल्पा आणि तिच्या प्रियकराची नजर मृतक सुनील खेमकाच्या प्रॉपर्टी आणि पैशावर होती. शिल्पाने प्रियकरासोबत परदेशात पळून जाण्याच प्लानिंग केलं होतं.

नंतर तिने प्रियकर मोहम्मद शकीलला घरी बोलावलं

शिल्पा बऱ्याचकाळापासून प्रियकरासोबत मिळून नवऱ्याच्या हत्येच प्लानिगं करत होती. याआधी सुद्धा पूर्ण योजनेसह नवऱ्याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यात यश मिळाल नव्हतं. शिल्पाने आधी पती सुनील खेमकाला झोपेच्या गोळ्या मिसळलेलं दूध पिण्यासाठी दिलं. सुनील गाढ झोपल्यानंतर तिने प्रियकर मोहम्मद शकीलला घरी बोलावलं. शिल्पाने हत्येसाठी प्रियकराच्या मित्राला 50 हजाराची सुपारी दिली होती. त्यामुळे शकीलसोबत त्याचा मित्रही आला.

कशी केली हत्या?

शिल्पा आणि तिच्या प्रियकराने आधी उशीने सुनीलच तोंड दाबलं. त्यानंतर सुपारी घेणाऱ्याने चाकूने वार करुन सुनीलची हत्या केली. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी शिल्पा तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्याला अटक केलीय. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत.