Rekha Jare Murder | आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात, सुपारी, हत्येनंतर आणखी एक गुन्हा

| Updated on: Dec 29, 2020 | 5:45 PM

तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. (Rekha Jare Murder Case Accused Bal Bothe One more Case Filed)

Rekha Jare Murder | आरोपी बाळ बोठेचा पाय आणखीनच खोलात, सुपारी, हत्येनंतर आणखी एक गुन्हा
Rekha Jare Murder Case
Follow us on

अहमदनगर : नगरमधील रेखा जरे हत्याकांडमधील (Rekha Jare Murder Case) फरार आरोपी बाळ बोठेचा (Bal Bothe) पाय आणखीनच खोलात गेला आहे. बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहे. त्यानंतर बाळ बोठेवर आता खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. (Rekha Jare Murder Case Accused Bal Bothe One more Case Filed)

नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात बोठेवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. तुम्ही कार्यालयाची परवानगी न घेता निवडणूक लढवली आहे. यातून तुम्हाला बाहेर पडायचे असेल, तर दहा लाख रुपये देऊन तडजोड करा अशी मागणी बोठेने केली होती.

तर बोठेने नोकरी घालवण्याची भीती घालून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करुन आपली बदनामी केल्याचा बोठेवर आरोप करण्यात आला आहे. बोठेसह वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत दहीफळे यांचंही यामध्ये नाव घेण्यात आलं आहे. तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत 3 दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेतला आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं भासवण्यात आलं होतं. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला. (Rekha Jare Murder Case Accused Bal Bothe One more Case Filed)

संबंधित बातम्या : 

Rekha Jare Murder | वादातून नाही, तर सुपारी देऊन हत्या, नगरच्या रेखा जरे हत्याकांडातील पत्रकार कोण?

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?