मुंबई : मुंबईमध्ये सध्या रेमेडेसिवीर इंजेक्शनची मागणी भरपूर मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याचा फायदा घेऊन वांद्रे पासून बोरवलीपर्यंतच्या अनेक मेडिकलमध्ये रेमडेसिवीरची चोरी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. रेमडेसिवीर इंजेक्शनची चोरी करणाऱ्या आरोपीस कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावर या प्रकरणाचा छळा लावला आहे (Remdesivir Injection thief arrested in Oshiwara by Kandivali Police).
आरोपीची 12 पेक्षा जास्त मेडिकलमध्ये चोरी
पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव करीन साब उल्ला खान असं आहे. विशेष म्हणतो तो अवघ्या 24 वर्षांचा आहे. पण तो कुख्यात चोरटा आहे. त्याने आतापर्यंत वांद्रेपासून बोरीवली पर्यंतच्या 12 पेक्षा जास्त दुकानांमध्ये चोरी केली आहे. पोलीस सध्या त्याची चौकशी करत आहेत.
चोराने पोलिसांना काय सांगितलं?
आरोपीने चौकशीत रेमडेसिवीर इंजेक्शन चोरी करण्यामागील कारण सांगितलं. मी न्यूज चॅनलवर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढल्याचं ऐकलं. हे इंजेक्शन चोरले तर ब्लॅकमध्ये मोठ्या किंमतीत विकू शकतो. त्यामुळेच मेडिकल दुकाने फोडून इंजेक्शनची चोरी केली, असा कबूली जबाब चोरट्याने दिला आहे.
पोलिसांनी चोराला अटक कशी केली?
कांदिवली पोलिसांनी सुरुवातीला सर्व मेडिकलच्या परिसरातील सीसीटीव्ही पाहिले. त्यामध्ये चोरटा एकच असल्याचं निषपण्ण झालं. पोलिसांनी मेडिकल दुकानांच्या आजूबाजूच्या परिसरातीलही सीसीटीव्ही बघितले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारावरच ओशिवरा येथून अटक केली. विशेष म्हणजे चोरटा हा नुकताच जेलमधून सुटून आला होता (Remdesivir Injection thief arrested in Oshiwara by Kandivali Police).
हेही वाचा : हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या