सांगलीत भर वस्तीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, अंगावर शहारे आणणारी घटना

| Updated on: Jun 17, 2023 | 10:54 PM

सांगली शहरात आज धक्कादायक घटना घडली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर त्यांच्या राहत्या घराच्या दरवाज्यावर बसलेले असताना अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यामुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

सांगलीत भर वस्तीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, अंगावर शहारे आणणारी घटना
Follow us on

सांगली : सांगली शहरात आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर तब्बल आठ गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नालसाह मुल्ला असं या गोळीबारात मृत्यू झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला आहे. गोळीबाराची ही घटना शंभरफुटी रोडजवळ घडली. संबंधित परिसरत गजबजलेला असतो. तसेच नालसाब मुल्ला हे त्यांच्या राहत्या घराच्या दारावर बसले असताना ही हल्ल्याची घटना घडली.

पोलिसांनी या घटनेविषयी माहिती दिली आहे. विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत रात्री सव्वा आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास नालसाब मुल्ला यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतक नालसाब मुल्ला यांच्यावरही जुने गुन्हे दाखल असल्याची पोलिसांची माहिती

“विश्राम बाग पोलीस आणि इतर पथकं घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. मृतक नालसाब मुल्ला यांच्यावरही जुने गुन्हे होते, अशी माहिती मिळत आहे. याबाबत सखोल माहिती घेतली जाईल. तसेच घडलेल्या घटनेचा सविस्तर तपास केला जाईल”, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

हे सुद्धा वाचा

नालसाब यांचा उपचारादरम्यान मृत्यू

अज्ञात आरोपी नालसाब मुल्ला यांच्यावर हल्ला करुन पळून गेले आहेत. त्यांचा शोध घेणं पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. आरोपींनी मुल्ला यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. तसेच गोळीबार केला होता. मुल्ला यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. दरम्यान, संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळचा पंचनामा केला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली, डीवायएसपी अण्णासाहेब जाधव आणि इतर पोलीस अधिकार दाखल झाले. घटनास्थळी पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले. परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं. त्यामुळे पोलीसही सतर्क झाले. पोलिसांकडून सध्या संपूर्ण काळजी घेतली जातेय.

संबंधित घटनेचे धागेदोर आता नेमके कुठपर्यंत जातात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सांगली शहरात रात्रीच्या साडे आठ वाजेच्या सुमारास अशाप्रकारची घटना घडने हे धक्कादायक आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे या घटनेतून नमूद होतंय, अशी चर्चा आता सांगली शहरात जोर धरु लागली आहे. तसेच या घटनेनंतर परिसरातील स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.