इचलकरंजीः इचलकरंजी शहरात आज भीषण अपघात (Accident) झाला. शहरातील जनता चौकात राज्य परिवहन मंडळाची बस आणि एक खासगी स्कूल बस (School Bus) यांची धडक झाली. जनता चौकात ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की, यात काही प्रवासी आणि विद्यार्थी जखमी झाले. दोन्ही बसचंही मोठं नुकसान झालं. यातील काही मुलांना गंभीर जखम झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इचलकरंजी (Ichalkaranji) शहरात दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही दिवसात यामुळे जीवितहानीदेखील जास्त झाली आहे. आजच्या अपघातात स्कूल बसचंही नुकसान झालं तसंच एसटी बसच्याही काचा फुटल्या.
शहरात आज जनता चौकामध्ये स्कूल बस आणि एसटीचा अपघात झाला.
स्कूल बसचा ड्रायव्हर अमीन पटेल हे बस घेऊन शाहू कॉर्नर कडून जनता बँक चौकाकडे येत होते. तर एसटी चालक अजित कांबळे एसटी घेऊन गांधी पुतळा होऊन एसटी स्टॅन्डकडे जात होते. सकाळी आठच्या सुमारास दोन्ही गाड्या समोरा-समोर आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दोन्ही बस एकमेकांवर धडकल्या. यात स्कूल बसच्या ड्रायव्हर कडील बाजूस मोठा धक्का बसला. स्कूल बसमधील सीटवर बसलेले विद्यार्थी जखमी झाले आहेत तर एसटी समोरून धडक दिल्यामुळे एसटीची काच फुटली आहे यामध्ये दोन्ही वाहनातील दहा ते बारा जण जखमी झाले आहेत.
या अपघातात स्कूल बसमधील विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनता चौकांमध्ये अपघात घडल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. ही स्कूलबस आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांना घेऊन शाळेमध्ये जात होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि पालक अपघात स्थळी आले. काही मुले जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तर स्कुलबस ड्रायव्हर अजित पटेल हा ही किरकोळ जखमी झाला आहे. अपघात इतका मोठा होता की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, शहरात स्कूल बस चालवणाऱ्यांविरोधात पालक आणि सर्वसामान्य नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. शहरातील गजबजलेल्या भागांतूनही हे बसचालक भरधाव वेगाने वाहने नेतात. वाहतूक नियम पाळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.