लखनऊ: भारतात सध्या कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्ह आहेत. तर, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नागरिकांना कोरोना प्रसार रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील बरेलीतील बँक ऑफ बडोडादाच्या शाखेत एक व्यक्ती विनामास्क प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर मास्क लावून त्यानं सुरक्षारक्षकाचा आदेश डावलून शाखेत जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे संतप्त झालेल्या सुरक्षा रक्षकानं थेट गोळीबार केला. (Security Guard Shoots Man in Uttar Pradesh Bareilly over entry in Bank)
उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये जंक्शन रोडवर असणाऱ्या बँक ऑफ बडोदाच्या शाखेमध्ये हा प्रकार घडला. सुरक्षा रक्षकानं जेवणाची सुट्टी असल्याचं सांगितलं असताना बँकेत प्रवेश करणाऱ्या ग्राहकावर गोळीबार केला. पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतलं असून गोळी लागलेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केला आहे.
सुरक्षारक्षकाचं काम करणाऱ्या केशव या व्यक्तीचा राजेश नावाच्या ग्राहकाशी बँकेत प्रवेश करण्यावरुन वाद झाला. राजेश सुरुवातील विनामास्क बँकेत जाण्याचा प्रयत्न करत होता,त्यामुळे सुरक्षा रक्षकानं त्याला अडवले. मास्क लावून बँकेत जाण्याचा प्रवेश करणाऱ्या राजेशला सध्या जेवणाची सुट्टी झाली आहे. त्यानंतर जावा असं सागितल्यानं दोघांमध्ये वाद झाला. या वादामध्ये सुरक्षारक्षक केशव यानं राजेशवर गोळीबार केला.
राजेशची पत्नी प्रियांका हिनं सुरक्षारक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माझे पती सुरुवातीला विनामास्क बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना मास्क लावण्यास सांगण्यात आलं. मास्क लावल्यानंतर बँकेत जाण्याचा प्रयत्न करण्याचा केला तर जेवणाची सुट्टी झाली असल्याचं सांगितलं. यानंतर दोघांमध्ये वाद सुरु झाला. त्यानंतर पतीनं बँकेत जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुरक्षा रक्षकानं गोळीबार केल्याचं, प्रियांका हिनं सांगितलं.
पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला या घटनेनंतर ताब्यात घेतलं आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अद्याप या प्रकरणामागील नेमकं कारण समोर आलं नसल्याचं पोलीस अधीक्षक रविंद्र कुमार यांनी सांगितलं.
Maharashtra Unlock: संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या लेवलमध्ये , कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्णयhttps://t.co/8aHZ6mxuF3#Maharashtra | #MaharashtraUnlock | #Corona | #MaharashtraUnlocklevel
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 25, 2021
इतर बातम्या:
राज्य सरकारला कोट्यवधींचा चुना लावणारा ULC घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सापडला, सूरतमधून बेड्या
पर्सनल सेक्रेटरी आणि पीए ईडीच्या ताब्यात, चौकशींचे खलबतं सुरु, अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ
(Security Guard Shoots Man in Uttar Pradesh Bareilly over entry in Bank)