नाशिकः मालेगावमध्ये ड्रग माफियाने हातपाय पसरल्याचे उघड झाल्याने नाशिक जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरात कुत्ता गोळीसह मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री होते. हे जाळे नेमके कुठपर्यंत आहे, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
मुंबईच्या नार्को टेस्ट विभागाने नुकतीच एक मोठी कारवाई केली. गुजरातमधल्या मीरादातार येथे झोपडपट्ट्यांमधली अमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी त्यांनी छापे मारले. त्यात रुबीना हे नाव पुढे आले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा ती ड्रग माफिया असल्याचे उघड झाले. तिचे पूर्ण नाव रुबीना नियाज शेख आहे. पोलिसांनी रुबीनाला बेड्या ठोकल्यात. मात्र, या टोळीचा म्होरक्या निलोफर सांडोले पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. याप्रकरणी रुबीनाचा कसून चौकशी केली असता, तिच्या टोळीने मालेगावमध्ये हातपाय पसरल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आता अमली पदार्थांच्या टोळीची चेन उद्धवस्त करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
रुबीनाचे उच्चभ्रू वस्तीत तीन बंगले
रुबीना राज्यभर ड्रग पुरवठा करायची. त्यासाठी तिने आपल्या हॅण्डलर्सचे जाळे तयार केले आहे. या व्यवसायातून कोट्यवधींची माया जमवली आहे. त्यातून मालेगावधल्या उच्चभ्रू वस्तीमध्ये तीन आलिशान बंगले खरेदी केले आहेत. सोबतच तिची इतरही मालमत्ता असल्याचे समजते. त्यात सायने शिवारात लाखोंची जमीन असल्याचे उघड झाले आहे.
ड्रग एमडीचा मुख्य व्यवसाय
रुबीना शेखचा मुख्य व्यवसाय हा ड्रग एमडीचा आहे. ती आपल्या पंटरमार्फत राज्यभरात ड्रगचा पुरवठा करते. मालेगाव शहरात कुत्ता गोळी व अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. हीच बाब हेरून तिने शहरात बस्तान बसवल्याचे समजते. तिच्या टोळीमधील पंटरचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
तरुणांना हेरले जायचे
ड्रग परवठा करणारे पंटर नेहमी तरुणांच्या शोधात असतात. त्यांना एकदा ड्रगचे व्यसन लागले की, त्यातून बाहेर पडणे अवघड होते. हेच हेरून ते उच्चभ्रू आणि धनाढ्य घरातल्या तरुणांना जाळ्यात ओढतात. मालेगावमध्येही रुबीनाचे उच्चभ्रू वसाहतीतच बंगले आढल्याने खळबळ उडाली आहे. आता माफियांची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
इतर बातम्याः
खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन
सोन्याची आभाळाकडे वाटचाल; नाशिक सराफात पुन्हा उसळी!
(Sensation of Malegaon connections of drug trafficking; Mafia reveals billions of assets in the city, supply of dog pills)