कोट्यवधींची मालकीण, वाद झाला, शरीरात छोटी छोटी छिद्रे, मग ‘तो’ घात की अपघात?

| Updated on: Jun 21, 2023 | 4:54 PM

रुग्णालयात पोहोचल्यावर पोलिसांना त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे कळले. पोलिसांना माहिती मिळाली अपघात झाल्याची परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यामुळे पोलीसांचा गोंधळ उडाला.

कोट्यवधींची मालकीण, वाद झाला, शरीरात छोटी छोटी छिद्रे, मग तो घात की अपघात?
CRIME NEWS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत कोट्यवधींची मालकीण वृद्ध महिलेच्या मृत्यूने डॉक्टर आणि पोलिसांनाही गोंधळात टाकले आहे. सुधा गुप्ता (72) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्या पतीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले असून सुधा यांना 3 मुलगे आणि 2 मुली आहेत. दोन मोठे मुलगे डॉक्टर आहेत तर तिसरा मुलगा प्रॉपर्टी डीलर आहे. तर दोन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यांचीही परिस्थिती चांगली आहे. सुधा यांच्या कुटुंबाकडे अनेक मालमत्तेची मालकी आहे. मात्र, त्यांचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. दरम्यान, अपघात झाला म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काही वेगळेच आढळून आल्याने आता ती घात होता की अपघात याचा तपास पोलीस करत आहेत.

दिल्लीच्या मंडवली भागात एका 72 वर्षीय महिलेचा रस्ता अपघात झाला. दुपारी अडीचच्या सुमारास स्थानिक पोलिसांना दोन पीसीआर कॉल आले. पहिल्या कॉलमध्ये एका महिलेवर दोन पुरुषांनी शस्त्रांनी वार केल्याची माहिती देण्यात आली. तर, दुसऱ्या कॉलमध्ये तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांनी कॉल येण्याआधी काहींनी अपघात झालेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते.

हे सुद्धा वाचा

काही वेळाने पोलिसांचे एक पथक घटनास्थळी तर दुसरे पथक रुग्णालयात पोहोचले. दुसऱ्या पथकाला त्या महिलेला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याचे समजले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्यावर पोलिसांना त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे कळले. पोलिसांना माहिती मिळाली अपघात झाल्याची परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी जी माहिती दिली त्यामुळे पोलीसांचा गोंधळ उडाला.

डॉक्टरांना त्या महिलेच्या शरीरावर अनेक छोटी छोटी छिद्रे आढळून आली. तसेच, धारदार वस्तूचे वार झाल्याचेही डॉक्टरांना दिसून आले. हा अपघात नसून घातपात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

पोलिसांना प्राथमिक तपासात वृद्ध महिलेचे कोणाशी काही वैर होते का, याचा शोध घेत परिसरात सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यात त्यांना दोन संशयास्पद व्यक्ती आढळल्या. तसेच, पोलिसांनी त्या मृत वृद्ध महिलेच्या कुटुंबीयांचा तपास केला.

या घटनेची माहिती देताना डीसीपी अमृता गुगुलोथ म्हणाल्या, ‘महिलेला प्रथम ज्या रुग्णालयात नेण्यात आले होते तिथून मिळालेल्या प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार तिचा रस्त्यात अपघात होऊन ती जखमी झाली होती. परंतु, दुसर्‍या रुग्णालयात आम्हाला कळले त्या महिलेचा मृत्यू झाला. तिच्या मृतदेहाची तपासणी केली असता पोलीस कर्मचाऱ्यांना तिच्या शरीरावर अनेक छिद्रे आढळून आली. ही छिद्रे एखाद्या मोठ्या सुईने निर्माण केली असावीत असे दिसून आले.

त्याचसोबत तिच्या शरीरावर काही वार असल्याचेही तपासणीत आढळले. त्या महिलेच्या डाव्या खांद्यावर, चेहरा, छातीच्या बाजूला, कंबर आणि पाठीवर या जखमा होत्या. कुठल्यातरी धारदार वस्तूमुळे या जखमा झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांचे मत आहे. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी पोलिसांनी एका वाहन चालकाला अटक केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

फेरीवाल्यासोबत झाले होते भांडण

मंडवली येथील त्यांच्या घराबाहेर एक हातगाडीवाला उभा होता. त्यासोबत त्याचे भांडण झाले. या भांडणात त्या व्यक्तीने सुधा यांना धमकी दिली होती. त्यानंतर एका घराचे भाडे घेऊन सुधा आपल्या लक्ष्मीनगर येथील घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तसेच, मालमत्तेच्या वादातून हत्या कऱण्यात लै आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत.