Jalgaon Crime News: जळगाव येथील कानसवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. त्यांचे आई-वडील अन् लहान मुलासमोर मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड खडबड उडाली आहे. युवराज कोळी हे शिवसेना शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. गावातीलच तिघांनी जुन्या वादातून युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला. चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार केल्यानंतर ते जागीच कोसळले.
जळगावातील कानसवाडा येथील शिवसेनेच्या माजी उपसरपंचांची हत्या प्रकरणात एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भरत पाटील असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. इतर दोघे अद्याप फरार आहेत. जुन्या वादातून वडील आणि दोघा मुलांनी मिळून माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. जळगावच्या भादली शिवारात युवराज कोळी हे त्यांचे आई- वडील तसेच लहान मुलासोबत शेतात जात असताना वाटेत त्यांच्या आई वडील यांच्यासमोर त्यांची हत्या करण्यात आली.
आरोपी देवा पाटील याचा ढाबा आहे. त्यांच्या ढाब्यावर 31 डिसेंबर रोजी मयत युवराज कोळी यांच्या सोबत वाद झाला होता. त्यानंतर पुन्हा गुरुवारी रात्री वाद झाला. या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या हत्या प्रकरणात भरत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. भरत पाटील याचे वडील देवा पाटील आणि भाऊ हरीश पाटील हे अद्याप फरार आहेत. त्यांचा सोध पोलीस घेत आहे.
पाटील अन् कोळी यांच्यात नेमका हा वाद काय होता? त्याची देखील माहिती घेतली जात आहे.
शिवसेना नेते युवराज कोळी यांच्या हत्येनंतर कानसवाडा गावासह जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोधासाठी पथक रवाना केले आहेत.