एकाच कुटुंबातील 8 सदस्यांच्या सामूहिक हत्येने एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबातील सदस्यानेच हे क्रूर हत्याकांड घडवून आणलं. आरोपीच आठ दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. पत्नी, आई, बहिण, भाऊ त्याची तीन मुलं या सर्वांनाच त्याने कुऱ्हाडीने कापलं. आरोपीने नंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. ग्राम बोदल कछार गावात बुधवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास ही भयानक घटना घडली. माहुलझिर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हे गाव येतं.
सर्व पीडित झोपेत असताना आरोपीने कुऱ्हाडीने हल्ला केला. नंतर स्वत:च जीवन सुद्धा संपवलं. एका आदिवासी कुटुंबात ही घटना घडलीय. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस उपस्थित आहेत. संपूर्ण गाव सील करण्यात आलय. लोकांची चौकशी सुरु आहे. बडे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचण्यासाठी रवाना झाले आहेत.
आरोपीच्या काकांनी जे सांगितलं, ते ऐकून काळाजचा थरकाप उडेल
संपूर्ण गावात दहशतीच, भीतीच वातावरण आहे. आरोपीच नाव दिनेश (27) आहे. “वर्षभरापासून आरोपीची मानसिक स्थिती चांगली नव्हती. उपचारानंतर तो सामन्या आयुष्य जगत होता. मागच्या आठवड्यात 21 मे रोजी त्याच लग्न झालं. लग्नानंतर पुन्हा त्याला मानसिक त्रास सुरु झाला. काल रात्री त्याने पत्नी वर्षा बाई, मोठा भाऊ श्रावण, त्याची बायको बारातो बाई, आई सिया बाई, श्रावणची तीन मुल आणि लहान बहिण या सर्वांना कुऱ्हाडीने वार करुन संपवलं. हे सर्व घराच्या अंगणात झोपले होते. त्यावेळी आरोपीने हे कृत्य केलं. माझी मोठी बहिण बाहेर गेली होती. तिने हे पाहिल्यानंतर दिनेशकडून कुऱ्हाड काढून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दिनेशने तिच्या नातवावर हल्ला केला. तो जखमी झालाय. आरडाओरडा झाल्यानंतर दिनेश पळून गेला व त्याने गळफास घेत जीवन संपवलं” आरोपीचे काका तलवी सिंह पटेल यांनी माहिती दिली.