जगात अनेक अशा घटना घडत असतात ज्यामुळे संपूर्ण मानव जातीला काळिमा फासली जाते. पाकिस्तानमध्ये एका मुलीने तिच्या प्रेमविवाहाला कुटुंबीयांनी नकार दिला म्हणून तिने धक्कादायक पाऊल उचललं. ती कुटुंबियांवर इतकी नाराज झाली की तिने तिच्या संपूर्ण कुटुंबीयांना मृत्यूंचा दारात ढकललं. रविवारी, 6 ऑक्टोबर रोजी सिंध प्रांतात ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केलीये. या प्रकरणामुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, कुटुंबीयांनी न स्वीकारल्याने मुलगी खूप संतापली होती. त्यानंतर त्याने ही घटना घडवून आणली.
आरोपी तरुणीने तिच्या प्रियकरासह आई-वडिलांसह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष देण्याचा कट रचला होता. तिने अन्नामध्ये विष मिसळले ज्यामुळे जेवन झाल्यानंतर कुटुंबातील सर्व 13 सदस्य आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात नेले. पण सर्वांचा मृत्यू झाला. कुटुंबातील 13 सदस्यांचा विष मिळलेले अन्न खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. खैरपूरजवळील हैबत खान ब्रोही गावात 19 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.
आपल्या पसंतीनुसार लग्न करण्यास तयार नसल्यामुळे तिने कुटुंबातील व्यक्तींचा काटा काढला. तरुणीला अटक करण्यात आली आहे. तरुणीने स्वत:च तिच्या कुटुंबीयांच्या जेवणात विष मिळवल्याचं कबुल केले आहे. एकाच कुटुंबातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी इनायत शाह यांनी सांगितले की, डॉक्टरांनी मृतांचे शवविच्छेदन केले तेव्हा सर्व लोकांचा मृत्यू विषारी अन्नामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता मुलगी आणि तिच्या प्रियकराने जेवणात विष मिसळल्याचे आढळून आले.
पोलिसांनी रविवारी आरोपी तरुणीला अटक केली. पोलिसांनी सांगितले की, मुलगी रागावली होती कारण तिने प्रयत्न करूनही तिचे कुटुंब तिच्या पसंतीच्या मुलाशी तिचे लग्न करण्यास तयार नव्हते. यासोबतच तिने असेही सांगितले की, पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने जेवणात विष मिसळल्याची कबुली दिली. पोलीस तरुणीच्या प्रियकराचाही शोध घेत आहेत. ज्याने आपल्या प्रियसीसोबत हे कृत्य केलंय.